Ajay Devgn SaamTv
मनोरंजन बातम्या

Ajay Devgn Injured: 'सिंघम अगेन'च्या शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी, सेटवर नेमकं काय घडलं?

Singham Again Movie: या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अजय देवगण व्यस्त आहे. मुंबईमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. अशातच शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

Ajay Devgn Injured During Movie Shooting:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' (Singham Again) या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाची सध्या शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाबाबत अजयचे चाहते खूपच उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स रिलीज करण्यात आले होते. जे पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अजय देवगण व्यस्त आहे. मुंबईमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. अशातच शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि त्याची टीम मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. यावेळी अॅक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी झाला आहे. अजय देवगणच्या डोळ्याला दुखापत झाली. एका कॉम्बॅट सीनचे शूटिंग करत असताना चुकून अभिनेत्याच्या चेहऱ्यावरला लागले. त्यामुळे त्याच्या डोळ्याला दुखापत झाली.

अजय देवगण जखमी झाल्यानंतर काही तासांसाठी त्याने विश्रांती घेतली. डॉक्टरांनी अजयवर उपचार केले. शूटिंगमध्ये खंड पडू नये यासाठी रोहितने विलनचे शूटिंग पूर्ण करून घेतले. अजय देवगणने आपल्या कामावर परिणाम होऊन दिला नाही. त्याने विश्रांती घेतल्यानंतर अपूर्ण राहिलेल्या शूटिंगला पुन्हा सुरूवात केली. 'सिंघम अगेन'ची टीम आता फिल्मसिटीमध्ये चित्रपटाचे उर्वरीत शूटिंग सुरू ठेवणार आहे.

या चित्रपटामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. यावेळी या चित्रपटामध्ये करीना कपूर खानसोबत दीपिका पदुकोणनेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एवढंच नाही तर रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ देखील या चित्रपटात दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील सर्वच सेलिब्रिटींचे एक एक करत फर्स्ट लूक समोर आले होते जे पाहून प्रेक्षकांच्या मनामध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली होती. रोहित शेट्टीचा हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT