Abhishek Bachchan Cryptic Post Instagram
मनोरंजन बातम्या

Aishwarya - Abhishek Divorce Rumors: अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय वेगळे होणार? इन्स्टा पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण

Abhishek Bachchan News: अभिषेक बच्चनने इन्स्टाग्रामवर अशी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे दोघांचंही नातं तुटल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Chetan Bodke

Abhishek Bachchan Cryptic Post

बच्चन कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात दूरावा आला असून हे कपल वेगळे होणार असल्याचा दावा केला जाॉत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात अनेक मतभेद असून त्यांचे खटके उडत असल्याचे म्हटले जात आहे. सध्या ऐश्वर्या बच्चन कुटुंबीयांसोबत राहत नसून तिच्या आईच्या घरी राहात असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

दरम्यान, अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघांमध्येही आराध्यामुळेच घटस्फोट होऊ शकत नाही, असेच म्हटले जात होते. मात्र, नुकतंच अभिषेक बच्चनने इन्स्टाग्रामवर अशी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे दोघांचंही नातं तुटल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. (Bollywood)

अभिषेक बच्चनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक स्टोरी शेअर केली होती. यामध्ये त्याने लिहिलंय की, ‘अपयशाची भीती तुमची स्वप्ने नष्ट करते आणि अपयशातून शिकूनच पुढे तुमची स्वप्ने पूर्ण होतील.’ सध्या अभिषेक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असताना ही पोस्ट शेअर केल्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. मध्यंतरी हे कपल अनेकदा एकत्रित स्पॉट सुद्धा झाले होते. (Bollywood News)

Abhishek Bachchan Cryptic Post

पत्नीपासून विभक्त झाल्याच्या चर्चां होत असताना, अभिषेकच्या या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. घटस्फोटाच्या चर्चा होत असताना, अभिषेकने अशी पोस्ट शेअर करणं ही काही पहिलीच वेळ नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक आणि ऐश्वर्या अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे वेगळे राहत आहेत. पण तरी सुद्धा बच्चन कुटुंबीय एकत्रित स्पॉट झाले आहे. (Social Media)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात काही ठीक नसल्याच्या बातम्या येत आहेत. एका कार्यक्रमात अभिषेकच्या हातामध्ये त्याच्या लग्नाची अंगठी दिसली नव्हती. त्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा आला असून हे कपल घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

इतकंच नाही तर ऐश्वर्याने सासरचं घर सोडून मामाच्या घरी शिफ्ट झाल्याचंही काहींनी म्हटलं होतं. मात्र हे सर्वजण त्यांची मुली आराध्याच्या शाळेच्या कार्यक्रमात एकत्र दिसले होते. आता हे कपल पुन्हा एकत्र दिसत असल्यामुळे त्यांच्यामध्ये सर्वकाही सुरळीत चालले असल्याचे म्हटले जात आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT