Abhishek Bachchan Instagram @bachchan
मनोरंजन बातम्या

Abhishek Bachchan Birthday: लागोपाठ १५ चित्रपट ठरले फ्लॉप, 'रिफ्युजी' नंतर असा बनवला बॉलिवूडचा 'गुरु'

Abhishek Bachchan Movie: बॉलिवूडला अनेक चित्रपट दिले पण एकापाठोपाठ त्याचे १५ चित्रपट फ्लॉप ठरले. त्यानंतर गुरू चित्रपटामुळे त्याला यश मिळाले आणि चांगली प्रसिद्धी मिळाली. आज अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या फिल्मी करिअरविषयी जाणून घेणार आहोत...

Priya More

Abhishek Bachchan Bday:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) ५ फेब्रुवारीला आपला ४७ वा वाढदिवस साजरा करणार आहे. अमिताभ बच्चनवर सध्या चाहत्यांकडून त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एका सुरपस्टारचा मुलगा असताना देखील अभिषेक बच्चनला बॉलिवूडमध्ये खूप स्ट्रगल करावे लागले. एक चांगला अभिनेता म्हणून सिद्ध करण्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली.

सुपसस्टारचा मुलगा अथवा स्टारकिड्स म्हटल्यावर त्यांना चांगले यश मिळते अथवा चित्रपट मिळतात असा अनेकांचा समज असतो. पण अभिषेकच्या बाबतीत तसं नाही झालं. त्याने बॉलिवूडला अनेक चित्रपट दिले पण एकापाठोपाठ त्याचे १५ चित्रपट फ्लॉप ठरले. त्यानंतर गुरू चित्रपटामुळे त्याला यश मिळाले आणि चांगली प्रसिद्धी मिळाली. आज अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त (Abhishek Bachchan Birthday) आपण त्याच्या फिल्मी करिअरविषयी जाणून घेणार आहोत...

अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनने 2000 मध्ये 'रिफ्युजी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. वडील सुपरस्टार असताना देखील त्यांची ओळख बाजूला ठेवत ज्युनियर बच्चनने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेत्याचा पहिला चित्रपट जरी फारसा गाजला नसला तरी त्याने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. त्याचे सुरूवातीचे चित्रपट फ्लॉफ ठरले पण नंतर त्याला खऱ्या अर्थाने यश मिळाले. त्यानंतर त्याने मागे कधीच वळून पाहिले नाही.

करीना कपूरसोबत 'रिफ्युजी' चित्रपट केल्यानंतर अभिषेक बच्चनला एकापाठोपाठ एक अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. पण ते सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. त्याने एक-दोन-तीन नव्हे तर तब्बल 15 चित्रपट बॅक-टू-बॅक फ्लॉप चित्रपट दिले. ज्यात 'तेरा जादू चल गया' (2000), 'ढाई अक्षर प्रेम के' (2000), 'बस इतना सा ख्वाब है' (2001), 'मैने भी प्यार किया' (2002), 'शरारत' (2002), 'मैं प्रेम की दीवानी' (2003) आणि 'LOC- कारगिल' या चित्रपटांचा समावेश आहे.

पहिली चार वर्षे अभिषेक बच्चनसाठी खूपच निराशाजनक होती. एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर, 2004 हे वर्ष अभिषेकसाठी खास ठरले. कारण यावर्षात त्याने त्याच्या कारकिर्दीतील पहिला सुपरहिट चित्रपट दिला. 'धूम' हा त्यांचा पहिला हिट चित्रपट होता. एसीपी जय दीक्षितची भूमिका साकारणाऱ्या अभिषेकसोबतच या चित्रपटामध्ये जॉन अब्राहम, उदय चोप्रा, बिपाशा बसू, ईशा देओल हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.

'धूम'नंतर अभिषेक बच्चनला त्याच्या ढासळत्या करिअरला पुन्हा जिवंत करण्याची संधी मिळाली. 'बंटी और बबली'ने त्याला फिल्म इंडस्ट्रीत पाय रोवण्यास मदत केली. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यानंतर अभिषेकचे नशीब चमकल्यासारखे वाटले. त्याने 'सरकार', 'दस', 'ब्लफमास्टर', 'कभी अलविदा ना कहना', 'धूम 2', 'गुरु', 'सरकार राज', 'दोस्ताना', 'पा', 'बोल बच्चन', 'धूम 3', 'हॅपी न्यू इयर' यासारखे हिट चित्रपट दिले. 'पा'साठी अभिषेकला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अभिषेक बच्चनने मोठ्या पडद्यावर अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपट देऊन नाव कमावले असले तरी त्याला खरी लोकप्रियता OTT मधून मिळाली. 2020 मध्ये रिलीज झालेला अभिषेकचा पहिला OTT चित्रपट 'लुडो' प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. याच वर्षी अभिषेकची पहिली वेब सिरीज 'ब्रीथ'ही रिलीज झाली होती. यामध्ये अभिषेकच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

SCROLL FOR NEXT