Ira- Nupur Wedding Reception Party Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ira- Nupur Wedding Reception Video: आयरा- नुपूरच्या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटींनी लावले चार चाँद, जबरदस्त लूकने वेधलं लक्ष

Ira- Nupur Wedding Reception Party: आमिर खानने आपल्या मुलीच्या रिसेप्शन पार्टीचे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे आयोजन केले होते. रिसेप्शन पार्टीत बॉलिवूड जगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Priya More

Ira Khan And Nupur Shikhare Wedding:

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि रीना दत्ता (Reena Dutta) यांची मुलगी आयरा खानचे १० जानेवारीला उदयपूरमध्ये लग्न पार पडले. लग्नानंतर आयरा आणि नुपूरच्या रिसेप्शन पार्टीचे (Ira- Nupur Wedding Reception) शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. रिसेप्शन पार्टीमध्ये आयरा आणि नुपूर खूपच क्युट दिसत होते. आयरा खान आणि नुपूर शिखरेच्या रिसेप्शन पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आयरा आणि नुपूरच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. लग्नानंतर आता त्यांची रिसेप्शन पार्टी मुंबईमध्ये पार पडली. आमिर खानने आपल्या मुलीच्या रिसेप्शन पार्टीचे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे आयोजन केले होते. रिसेप्शन पार्टीत बॉलिवूड जगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. आयरा आणि नुपूरच्या रिसेप्शन पार्टीमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी हजेली लावली. यावेळी संपूर्ण खान कुटुंबीयांनी एकत्र फोटो सेशन केले.

आयरा आणि नुपूरच्या पार्टीत रणबीर कपूर, सलमान खान, शाहरुख खान, गौरी खान, कतरिना कैफ, माधुरी दीक्षित, रवीना टंडन, जुही चावला, हेमा मालिनी, रेखा, सायरा बानू, सुष्मिता सेन, अनिल कपूर, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, कपिल शर्मा, रणदीप हुड्डा आणि साऊथ अभिनेता नागा चैतन्यसह अनेक स्टार्स दिसले. यासोबत मराठी सिनेसृष्टीची परशा आणि अर्ची म्हणजेच आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांनी देखील हजेरी लावली. या सर्व स्टार्सनी खूपच छान ड्रेसिंग केली होती. त्यांनी मीडियासमोर एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही राजकीय नेत्यांनी देखील आयराच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली. आदित्य ठाकरे, रश्मि ठाकरे, तेजस ठाकरे, राज ठाकरे देखील यावेळी आले होते. यावेळी सचिन तेंडुलकर आणि जहीर खान यांनी देखील हजेरी लावली.

आयरा आणि नुपूर रिसेप्शन पार्टीमध्ये खूपच क्युट दिसत होते. सर्वांच्या नजरा त्यांच्याकडेच खिळलल्या होत्या. रिसेप्शन पार्टीत आयराने लाल रंगाचा लेहेंगा तर नुपूरने शेरवानी परिधान केली होती. यावेळी आयरा आणि नुपूरच्या संपूर्ण कुटुंबीयांनी जबरदस्त फोटो सेशन केले. फोटोमध्ये आयरा-नुपूर, आमिर खान, एक्स वाइक रीना दत्ता, मुलगा जुनैद खान, पुतण्या इम्रान खान, बहीण निखत खान, मुलगा आझाद राव खान आणि नुपूरचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. आमिर खान, जुनैद खान आणि नुपूर शिखरे यांनी एकाच कलरची ड्रेसिंग केली होती.

रिसेप्शन पार्टीमध्ये फोटो सेशन करताना आमिरने सर्वांना किरण राव का नाही आली यामागचे कारण सांगितले. तब्येत खराब असल्यामुळे किरण रावा या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावू शकली नाही. रिसेप्शन पार्टीत अभिनेत्री जया बच्चन तिच्या रेग्युलर मोडमध्ये दिसली. तिने पापाराझींना एकदा नाही तर दोनदा फटकारले. यावेळी जया बच्चनने मुलगी श्वेता बच्चन आणि सोनाली बेंद्रेसोबत पोझ दिल्या. यावेळी रिसेप्शन पार्टीत हजेरी लावत सलमान खानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भाईजानचा लूक सर्वांना प्रचंड आवडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

Crime News: पुण्यात टोळी युद्धाचा भडका, आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरला सुरुवात

Asia Cup Hockey 2025 : टीम इंडियाने चौथ्यांदा कोरलं आशिया कपवर नाव; अंतिम फेरीत दक्षिण कोरियाला धूळ चारली

SCROLL FOR NEXT