Ira Khan Kelvan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ira Khan Kelvan: आमिर खानची मुलगी इरा लग्नासाठी नटली, केळवणाला नुपूरसाठी घेतला मराठीमध्ये जबरदस्त उखाणा; VIDEO पाहाच

Ira Khan And Nupur Shikhare Wedding: आयरा आणि नुपूरचा सध्या केळवणाचा कार्यक्रम सुरू आहे. यासाठी दोघेही खास अंदाजमध्ये दिसत आहेत.

Priya More

Ira Khan And Nupur Shikhare:

बॉलिवूडचे (Bollywood) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानची मुलगी आयरा खान (Ira Khan) सध्या चांगलीच चर्चेत आहे. आयरा खान लवकरच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) विवाहबंधनात अडकणार आहे. आयराच्या लग्नापूर्वीच्या विधीला सुरूवात झाली आहे.

आयरा आणि नुपूरचा सध्या केळवणाचा कार्यक्रम सुरू आहे. यासाठी दोघेही खास अंदाजमध्ये दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे आयराने केळवणाच्या कार्यक्रमादरम्यान नुपूरसाठी मराठीमध्ये उखाणा घेतला आहे. आयरा आणि नुपूरने केळवणासाठी केलेल्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.

आयराने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंवर तिच्या केळवण कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. केळवणाच्या कार्यक्रमात आयराने नुपूरसाठी मराठीमध्ये घेतलेल्या खास उखाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयराने केळवण कार्यक्रमासाठी मरून रंगाची नऊवारी साडी नेसली होती.आयराने कपाळावर लावलेली लाल रंगाची टिकली तिच्या सौंदर्यामध्ये भर टाकत आहे. तर नुपूरने पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाची पँट परिधान केली आहे. आयरा आणि नुपूरचा हा मराठमोळा लूक खूपच खास आणि सुंदर दिसत आहे. हे कपल खूपच क्यूट दिसत आहे.

आयराने नुपूरसाठी उखाणा घेताना असे म्हटले आहे की,'आता मला मराठी येते आणि मी पॉपोयला घेऊन जाते' आयराने केळवण कार्यक्रमाचे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'केळवण २, उखाणा २. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.', असं लिहिलं आहे. आयराच्या या फोटोंवर कमेंट्स करत तिच्या चाहत्यांनी दोघांच्याही सौंदर्याचे कौतुक केले आहे.

आयराने यापूर्वीच्या केळवण कार्यक्रमात नुपूरसाठी खास उखाणा घेतला होता. तिने त्यावेळी असे म्हटले होते की, 'मला मराठी येत नाही पण पॉपोयसाठी मी कधी नाही म्हणत नाही' उखाणा घेतल्यानंतर आयराने नुपूरला पुरणपोळी खायला दिली. दरम्यान, आयरा आणि नुपूर ३ जानेवारीला लग्न करत आहेत. आयराचा नवरा नुपूर शिखरे फिटनेस ट्रेनर आहे. ३ जानेवारीला ते कोर्ट मॅरेज करणार आहे. त्यानंतर राजस्थानमधील उदयपूरमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यानंतर १३ जानेवारीला मुंबईत आयराचे ग्रँड वेडिंग रिसेप्शन होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : तिहेरी हत्याकांड! १६ वर्षांच्या मुलाने भाऊ-वहिनीची केली निर्घृण हत्या, ३ वर्षांच्या पुतण्यालाही सोडलं नाही

kalsubai peak : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट! कळसूबाई शिखराला 'कळसू' हे नाव कसं पडलं? कारण वाचून थक्क व्हाल

Nashik Vidhan Parishad: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बंडखोर गीतेंचा दणदणीत विजय; दराडेंचा भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेचा सण 'या' पदार्थाशिवाय अपूर्ण, फक्त १० मिनिटांत बनेल आंब्याची स्पेशल रेसिपी

SCROLL FOR NEXT