Ira Khan Trolled Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ira Khan Trolled: आयरा- नुपूरचं लग्न थाटामाटात पार पडलं, कौतुकही झालं...; पण 'त्या' फोटोमुळे आयरा होतेय ट्रोल

Ira Khan Smoking Photo: एका फोटोमुळे आयरा खान सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.

Chetan Bodke

Ira Khan Smoking Photo

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या लेकीच्या लग्नामुळे बराच चर्चेत आहे. नुकतंच त्याच्या लेकीचा मुंबईमध्ये ग्रँड रिसेप्शन सोहळाही पार पडला. त्यावेळी अख्ख्या बॉलिवूडसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनीही रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली होती.

आमिरची लेक आयरा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच आयराने 'प्री- वेडिंग थींग्स' असं कॅप्शन देत सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमुळे अभिनेत्री प्रचंड ट्रोल होत आहे. (Bollywood)

शेअर केलेल्या एका फोटोमध्ये आयराने तोंडामध्ये सिगारेट धरलेली दिसते, त्या फोटोमुळे आयरा सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतेय. शेअर केलेल्या फोटोंमध्ये आयरा तिच्या मित्र मैत्रिणींसोबत, फॅमिलीसोबत दिसत आहे. शेवटच्या एका फोटोमध्ये आयराने तोंडामध्ये सिगारेट धरलेली दिसते. दरम्यान आयराने असाच कॅज्युअल सेल्फी शेअर केला आहे. (Social Media)

मिळालेल्या माहितीनुसार, हा फोटो आयराच्या प्री वेडिंग शुट दरम्यानचा आहे. मात्र तरी देखील तिनं अशा आनंदाच्या प्रसंगी असे फोटो पोस्ट करणे चुकीचे असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

आयराच्या त्या पोस्टवर नेटकरी म्हणातात, 'आयरा तुझा हा फोटो कौतुक करावा असा नाही.', 'तुला अशा प्रकारचा फोटो शेयर करुन नेमकं काय सांगायचे आहे हे काही कळलं नाही. तू आमिर खानची मुलगी आहेस तू असे वागणे तुला शोभत नाही.', (Bollywood News)

'लोक तुला तुझ्या चांगल्या सवयींमुळे फॉलो करतात आणि तू स्वत:चीच प्रतिमा मलीन करत आहेस' असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला सुनावलं आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT