Pathaan 7th day collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathan Collection: बॉक्स ऑफिसवर 'पठान'चा जलवा कायम, ८व्या दिवशीही चित्रपटाची जबरदस्त कमाई

'पठान' चित्रपटाने बुधवारी देखील चांगली कमाई केली आहे.

Pooja Dange

Pathan 8th Day Box Offcie Collection: शाहरुख खान ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकुळचा घातला. शाहरुख खानचे फॅन त्याच्या चित्रपटाची चातकासारखी वाट पाहत होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुखच्या फॅन्सनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली आणि शाहरुखच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळवून दिले.

'पठान' चित्रपट प्रदर्शित होऊन ८ दिवस झाले आहेत. परंतु ८व्य दिवशी देखील चित्रपटाची कमाई कमी झालेली नाही. Sacnilk एंटरटेनमेंटने दिलेल्या अहवालानुसार 'पठान' चित्रपटाने बुधवारी देखील चांगली कमाई केली आहे. त्यांनी ट्विट करत सांगितले आहे की, 'पठान'ने ८व्या दिवशी १९ करोडची कमाई केली आहे. 'पठान'चे एकूण भारतातील कलेक्शन ३५० करोड झाले आहे.

'पठान' हा शाहरुख खानच्या करिअरमधला पहिला चित्रपट आहे ज्याने बॉक्स ऑफिसवर इतके कलेक्शन केले आहे. त्याचबरोबर 'पठान' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे.

'पठान' चित्रपटाने पहिल्या दिवशी 57 कोटी, दुसऱ्या दिवशी 70 कोटी, तिसऱ्या दिवशी सुमारे 40 कोटी, चौथ्या दिवशी 53 कोटी, पाचव्या दिवशी 60 कोटी, सहाव्या दिवशी 26 कोटी, सातव्या दिवशी 23 कोटींची कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. जो इतक्या कमी वेळात 300 कोटींच्या क्लबमध्ये जाणारा 'पठान' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट आहे.

'पठान'चे बॉक्स ऑफिसवर कमाई सुरूच आहे. हा चित्रपट लवकरच 400 कोटींचा टप्पा पार करेल यात शंका नाही. या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात सलमान खानचाही कॅमिओ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT