Gadar 2- OMG 2 5th Day Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gadar 2- OMG 2 5th Day Collection: स्वातंत्र्य दिनी ‘गदर २’ आणि ‘OMG 2’ची दमदार कमाई; कमाईचा आकडा पाहून निर्मातेही भारावले

Chetan Bodke

Gadar 2- OMG 2 5th Day Box Office Collection: सनी देओलच्या ‘गदर २’ने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाचे कलेक्शन बॉक्स ऑफिसवर दिवसेंदिवस वाढतच आहे. ११ ऑगस्टला ‘गदर २’ आणि ‘OMG 2’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी प्रदर्शित झाले. पहिल्या आठवड्यात या दोन्ही चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहे. चला तर जाणून घेऊया, चित्रपटाच्या पाचव्या दिवसाच्या कमाईबद्दल...

११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर आपल्या कमाईबाबतीचा आलेख चढता कायम ठेवला आहे. चित्रपटाने कमाईच्या बाबतीत ‘बाहुबली’चा रेकॉर्डही मोडीत काढ आहे. पहिल्या व दुसऱ्या दिवशीच ‘गदर २’ ने जवळपास ८३ कोटींचा व्यवसाय केला होता. ७५ कोटींच्या बजेटमध्ये निर्मित केलेल्या या चित्रपटाचे थिएटरमध्ये शो हाऊसफुल्ल आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तर ‘OMG 2’ बद्दल बोलायचे तर, हा चित्रपट १५० कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट निर्मित झाला असून सध्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ गतीने कमाई सुरू आहे. या चित्रपटाने आतापर्यंत साधा १०० कोटींचा देखील गल्ला पार केलेला नाही.

दोन्ही चित्रपटांना लॉंग विकेंडचा चांगलाच फायदा झाला असून कमाईच्या बाबतीत दोन्ही चित्रपट अव्वल ठरले. स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘गदर २’साठी प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. या लॉंग विकेंडमुळे चित्रपटांच्या कमाईत भर पडलेली आहे. सॅकनिकच्या रिपोर्टनुसार ‘गदर २’ने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, तब्बल ५५ कोटींचा आकडा पार केला आहे. तर ‘OMG 2’ने पाचव्या दिवशी जेमतेम १९ कोटींची कमाई केली आहे. ‘OMG 2’ची ही कमाई आतापर्यंतची सर्वाधिक कमाई आहे.

‘गदर २’ आणि ‘OMG 2’च्या कमाईतला आजवरचा हा (१५ ऑगस्ट) एका दिवसाचा सर्वाधिक आकडा आहे. ‘गदर २’ने पहिल्याच आठवड्यात २२९ कोटींच्या आसपास कमाई भारतात केली आहे. लवकरच हा चित्रपट ‘द केरला स्टोरी’चा आणि शाहरुख खानच्या ‘पठान’लाही मागे टाकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तर सोबतच ‘OMG 2’ने पहिल्याच आठवड्यात ७४.१७ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या एकूण कमाईबद्दल बोलायचे तर, पहिल्या दिवशी चित्रपटाने इतकी खास कमाई केली नसून शनिवारी १५.३० कोटींची, तर रविवारी १७.५५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने काल अर्थात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशभरात १९ कोटींची कमाई केली आहे. आता अक्षय कुमारचा हा ‘OMG 2’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा आकडा पार करणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT