Dunki 2nd Day Box Office Collection Instagram
मनोरंजन बातम्या

Dunki 2nd Day Collection: किंग खानचा ‘डंकी’ परदेशातही सुसाट, दोन दिवसातच केली ‘इतक्या’ कोटींची कमाई...

Dunki Box Office Collection: राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले असून चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई करताना दिसत आहे.

Chetan Bodke

Dunki 2nd Day Box Office Collection

राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले असून चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई करताना दिसत आहे. शाहरुखच्या चित्रपटांची कायमच चाहत्यांमध्ये क्रेझ असते. ‘पठान’ आणि ‘जवान’ प्रमाणे ‘डंकी’ची सुद्धा चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. चित्रपटाची निर्माती गौरी खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये गौरीने चित्रपटाच्या दोन दिवसांच्या कमाईचा आकडा शेअर केला आहे.

निर्माती गौरी खानने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, चित्रपटाने दोन दिवसांत जगभरामध्ये ५८ कोटींची कमाई केल्याची माहिती दिली आहे. किंग खानच्या ‘डंकी’ चित्रपटाने दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर ४९. २० कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी २९. २ कोटी तर, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने २० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा शेअर करताना, ‘बरेच लांबून आलो होतो... आता खूप लांब जाऊ असं वाटतंय, तुमच्या प्रेमाने आणखी लांबचा पल्ला गाठायचा आहे.’ असं कॅप्शन तिने दिले आहे.

चित्रपटामध्ये चार मित्रांची कथा दाखवली आहे. त्यांना परदेशामध्ये जाण्याची इच्छा असते. पण पासपोर्ट नसल्यामुळे ते कशाप्रकारे परदेशामध्ये जाण्यासाठी चुकीचा मार्ग निवडतात. ते चारही मित्र परदेशामध्ये कसे जातात, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. 'डंकी' हा कौटुंबिक चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी करीत असून शाहरुख खानसह तापसी पन्नू, विक्रम कोचर, अनिल ग्रोवर, बोमन ईरानी आणि विकी कौशल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या सौंदर्याने केली जादू; फोटो पाहून थक्क व्हाल

Maharashtra Live News Update: पुण्यात वर्षभरात वाढला 748 मिमी पाऊस

Astrology Alert: मंदिरात चेंगराचेंगरी, रेल्वेची भयानक दुर्घटना; पुढील ५ महिने धोक्याचे, ज्योतिषाची चेतावणी

Crime News : डॉलर्स एक्स्चेंजच्या आमिषाने महिलेची फसवणूक; १ लाख रुपये घेऊन पसार, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Kiran Mane : "लै लै लै भारी वाटलं..."; किरण माने यांनी केलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं कौतुक, नव्या गाडीसोबत फोटो केला शेअर

SCROLL FOR NEXT