Maidaan Teaser Instagram
मनोरंजन बातम्या

Maidan Teaser: अजयचे ‘मैदान’मध्ये गगनचुंबी उडी; भगत सिंगनंतर अभिनेता साकारणार आणखी एक बायोपिक

‘भोला’ चित्रपटाच्या रिलीजसोबतच सुपरस्टार अजय देवगणने चाहत्यांना आणखी एक मोठी भेट दिली आहे.

Chetan Bodke

Ajay Devgan New Biopic: ‘भोला’ आणि ‘दृश्यम २’ ला प्रेक्षकांकडून मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर लवकरच अजय आणखी एका नव्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. सध्या त्याच्या आगामी चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर सर्वत्र होत आहे. अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित होताच या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे, सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. चाहत्यांनी ट्विटरवर चित्रपटाचे कौतुक केले आहे.

‘भोला’ चित्रपटाच्या रिलीजसोबतच सुपरस्टार अजय देवगणने चाहत्यांना आणखी एक मोठी भेट दिली आहे. त्याचा आगामी चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होत असून नुकताच ‘मैदान’चा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे, टीझरमध्ये, फुटबॉलच्या सुवर्णकाळातील कथा चित्रित करण्याचे काम केले आहे.

बॉलिवूडच्या सुपरस्टार कलाकारांच्या यादीत अजय देवगणचा समावेश आहे, ज्यांनी प्रत्येक चित्रपटातून प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘दृश्यम २’ नंतर तो ‘भोला’मध्ये एका साध्या माणसाच्या भूमिकेत दिसला होता. आता तो ‘मैदान’ चित्रपटात फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीमची भूमिका साकारणार आहे.

टीझरची सुरुवात, हेलसिंकी ऑलिम्पिक ग्राउंडपासून होते जिथे भारतीय खेळाडू मुसळधार पावसात फुटबॉल सामना खेळताना दिसत आहेत. या ऑलिम्पिक सामन्यात त्याचा सामना युगोस्लाव्हियाच्या खेळाडूसोबत होत आहे. या टीझरमध्ये भारतीय खेळाडू मुसळधार पावसात शूजशिवाय सामना खेळताना दिसत आहेत. अजय देवगण स्टारर ‘मैदान’ चित्रपटाचा हा टीझर 1952 ते 1962 पर्यंतचा सुवर्णकाळ दाखवतो, ते दशक भारतीय फुटबॉल खेळाडूंसाठी एक सुवर्णकाळ होता.

अजय देवगण या चित्रपटात प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत असून तो एका मैदानात आपल्या संघाला प्रशिक्षण देत आहे. भारताच्या युवा खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी स्वतःवर घेतो. मात्र, या टीझरमध्ये अतिशय सुंदरपणे, या काळात फुटबॉलपटूंना मैदानावर नेण्यासाठी त्यांना किती मेहनत घ्यावी लागते, या काही मिनिटाच्या टीझरमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. ‘आज मैदान मे उतरना ग्यारह, लेकीन दिखना सिरफ एक.’ अनेक मोठ्या कालावधीनंतर एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त साऊथ अभिनेत्री प्रियामणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय गजराज राव आणि बंगाली अभिनेत्री रुद्राणी यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ शर्मा यांनी केले आहे. आदिपुरुष नंतर हा चित्रपट 23 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT