Shahrukh Khan In Dubai  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan: 'मला घाबरण्याची गरज नाही'; आगामी सिनेमावरून शाहरुख असं का म्हणाला?

शाहरुख येत्या आगामी वर्षात तीन चित्रपटात दिसणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान अनेक वर्षाच्या मोठ्या ब्रेकनंतर मुख्य भूमिकेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 25 जानेवारी 2023 रोजी येणार्‍या पठाण या चित्रपटाची तो आतुरतेने वाट पाहत आहे. त्यानंतर त्याच्याकडे अॅटलीचा जवान आणि राजकुमार हिरानी यांचा डंकी या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हे दोन्ही चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहेत.

शुक्रवारी, शाहरुख शारजाह, UAE येथील एक्स्पो सेंटर येथे शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा (SIBF) 2022 या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात त्यांना ग्लोबल आयकॉन ऑफ सिनेमा अँड कल्चरल नॅरेटिव्ह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सोबतच त्याने त्या कार्यक्रमात पत्रकारांसोबतही संवाद साधला होता.

त्याच्या आगामी रिलीजबद्दल तो चिंताग्रस्त आहे का, असे विचारले असता, शाहरूखने उत्तर दिले, "मला वाटत नाही की मला घाबरण्याची गरज आहे, माझे सर्व आगामी चित्रपट सुपरहिटस असतील. हा विश्वास आहे ज्याने मी झोपतो, मी उठतो आणि याच विश्वासामुळे मी 57 वर्षातही स्टंट करतो आणि दिवसाचे 18 तास काम करण्याची ताकद देतो."

तसेच तो पुढे बोलतो, "मी करत असलेला चित्रपट जास्त लोकांना आवडणार नाही, असं मला वाटलं तर तो चित्रपट मी करत नाही. त्यामुळे मी जे बोलतो ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही. मी एक उत्कृष्ट चित्रपट केला आहे, या चित्रपटात काम करताना मी पूर्ण मेहनत घेतलेली आहे.

मी चित्रपट मनापासून केला आहे तर मी उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणार याची मला खात्री आहे. त्यामुळे माझ्या आगामी चित्रपटांची मला काळजी करण्याची गरज वाटत नाही." त्याच्या या उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

लहानपणापासूनच त्याच्यातला आत्मविश्वास कसा होता याची आठवण अभिनेत्याने करुन दिली, "मला माझी गणिताची परीक्षा आठवते. मला आठवते की मी खूप चांगला अभ्यास केला आहे आणि परिणामी, मला 100 पैकी 3 गुण मिळाले. पण मला वाटले होते की मी खरोखरच चांगला अभ्यास केला आहे." शाहरुखने चित्रपटाच्या यशाभोवती असलेल्या अनिश्चिततेबद्दल सांगितले.

शाहरुख खानने नुकताच त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या चाहत्यांसाठी भेट म्हणून, त्याने सिद्धार्थ आनंदच्या पठाणचा टीझर रिलीज केला, ज्यात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे हादरलं! आईनं २ लेकरांसह मृत्युला कवटाळलं, नवऱ्याच्या त्या कृत्यानं माऊलीने उचलले टोकाचं पाऊल

Long Hairstyles: लांब केसांसाठी 5 सोप्या हेअरस्टाईल्स

Masala Bhendi Recipe: नेहमीची भेंडीची भाजी खाऊन कंटाळलात? मग बनवा गावरान स्टाईल मसाला भेंडी

Buldhana : धक्कादायक! एकाच कुटुंबातील ३ जण, अन् २४ तासांत शहरातून ७ जण संशयास्पदरित्या बेपत्ता; नेमकं काय प्रकरण?

माझा नवरा जिवंत! अजितदादांसोबत विमान अपघातात मृत्यू झालेला तो नव्हेच, कॅप्टनच्या बायकोनं सांगितलं सत्य, वाचा

SCROLL FOR NEXT