Vicky-Katrina Wedding Anniversary  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vicky-Katrina Anniversary: विकी कौशलचा अंतरंगी डान्स होतोय व्हायरल; कतरिनालाही हसू आवरेना, पाहा VIDEO

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला आज 1 वर्ष पूर्ण झाले आहे. कतरिना आणि विकीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत एकमेकांना लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Chetan Bodke

Vicky-Katrina Anniversary: कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला आज 1 वर्ष पूर्ण झाले आहे. कतरिना आणि विकीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत एकमेकांना लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच कतरिनाने पती विकीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विकी एक अतरंगी डान्स करताना दिसत आहे, जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल 9 डिसेंबर 2021 रोजी सवाईमाधोपूर येथे विवाहबंधनात अडकले. कतरिना आणि विकीने त्यांच्या लग्नाच्या फोटोसोबत त्यांचे काही वैयक्तिक क्षणही शेअर केले आहेत. दोघांनी एकमेकांसाठी खास नोट देखील लिहिली आहे.

फोटो शेअर करताना कतरिनाने लिहिले की, 'माय रे ऑफ लाईट, हॅप्पी वन इयर...' अशा आशयाचा नोट लिहित इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

विकीने फोटोंच्या माध्यमातूनही आपले प्रेम व्यक्त केले आहे. विकीने लिहिले आहे की, 'वेळ पटकन निघून गेला... आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी तुझ्यावर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो, ज्याचा तू विचारही करु शकत नाहीस.'

कतरिनाने विकीचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आनंदाने नाचताना दिसत असून कतरिना त्याच्या डान्सवर हसत आहे. चाहत्यांनीही दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Farmers Devastated: मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश; अतिवृष्टीने बळीराजा हवालदिल,ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तीव्र

मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण; पुतळ्यावर लाल रंग फेकणाऱ्याला अटक

Thursday Horoscope : मनस्ताप वाढवणार, हातून चुका घडणार; 'या' राशीच्या लोकांना अडचणीचा काळ टाळून पुढे जावे लागणार

Neem Leaves: कडुलिंबाची पाने आहेत गुणकारी; त्वचा, केसांच्या समस्येसह मधुमेहावर ठरेल वरदान

UPI Cash Withdrawal: कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही UPI द्वारे आता घरीच कॅश मिळणार?

SCROLL FOR NEXT