धर्मेंद्र यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. धर्मेंद्र यांच्या चित्रपटांच्या आठवणी अनेकांच्या मनात आजही ताज्या आहेत. त्यांच्या जाण्यानंतर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या विले पार्ले येथील स्मशानभूमीत त्यांचे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचा मुलगा अभिनेता सनी देओल यांने स्मशान भुमीत हजेरी लावली आहे.
धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांनी स्मशानभूमीत हजेरी लावली. अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनही त्यांच्या अंतिम दर्शनासाठी स्मशानभूमीत पोहोचले आहेत. उपस्थित लोकांचे डोळे पाणावलले होते आणि वातावरणात भावनिक शांतता आहे.
धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत शोले, धर्मवीर, चुपके चुपके, ड्रीम गर्ल, मेरा गांव मेरा देश, कटी पतंग अशा अनेक अविस्मरणीय चित्रपटांमध्ये काम केले आणि लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले. अलीकडे ते शाहिद कपूर आणि क्रीती सेनन यांच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटात दिसले होते. त्यांच्या आगामी 'इक्कीस' या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच समोर आला होता आणि हा चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर भावूक झाले. सोशल मीडियावर त्यांनी एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहली. त्यांनी म्हटले की, "हा एका युगाचा अंत आहे. धर्मेंद्र एक मेगा स्टार, स्क्रीनवरील नायक आणि भारतीय सिनेमातील मोठे अभिनेते होते. पण त्याहून मोठं म्हणजे ते एक महान मनाचे, प्रेमळ आणि सर्वांना जवळ करणारे व्यक्तिमत्त्व होते."
धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत अभिनयासोबत अनेक चित्रपटांचे निर्मितीही केली होती. त्यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, रिपोर्टनुसार त्यांची एकूण नेटवर्थ सुमारे ३३५ ते ४५० कोटी रुपयांच्या दरम्यान होती. आज धर्मेंद्र यांच्या जाण्याने बॉलिवूड विश्वात आणि लाखो चाहत्यांच्या मनात एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांसह कलाकारांनी धर्मेंद्र देओल यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी त्यांच्यासोबतच्या कामाचे अनुभव सांगितले. धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाने पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.