Koffee with Karan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Karan Johar Deletes Twitter: करण जोहरचा ट्विटरला रामराम!

करण जोहरने ट्विटरला केले गुडबाय, ट्रोलिंगला कंटाळून त्याने हा निर्णय घेतल्याचे चर्चा सध्या सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलीवूडमधील (Bollywood) गॅासिप किंग म्हणून ज्याची ओळख आहे असा दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर हा नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतो. सोशल मीडियावर (Social Media) सक्रीय असलेल्या करण जोहरने आता पुन्हा एकदा नवी पोस्ट करत लोकांना कोड्यात टाकले आहे. करण जोहरने काल (१० ॲाक्टोबर) एक ट्विट करत ट्विटरला गुडबाय करत असल्याचे सांगितले आहे. करण जोहरने हे ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावर एकच गोंधळ झाला.

करने ट्विटमध्ये काय म्हटले?

“फक्त अधिकाधिक सकारात्मक ऊर्जेसाठी जागा निर्माण करत आहे आणि त्या दिशेने उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे. गुडबाय ट्विटर’, असे ट्विट करणने केले आहे.

Karan Johar Tweet

करण जोहरने (Karan Johar) या ट्विटनंतर अकाउंट देखील डिलीट केले आहे. काही दिवसांपूर्वीही करणने इंस्टाग्रामवर त्याच्या बहुचर्चित 'कॅाफी विथ करण' या शोचा मी भाग नसणार असल्याची पोस्ट केली होती. मात्र काही वेळेनंतर हा एक प्रॅन्क असल्याचे त्याने सांगितले होते. त्यामुळे आता जरी करण जोहरने ट्विटरला गुडबाय केले असले आणि अकाऊंट डिलीट केले असले तरी यात कितपत सत्य आहे हे येणारा काळच ठरवेल.

दरम्यान करण जोहरच्या आधी अनेक कलाकारांनी ट्विटर (Twitter) अकाऊंटवरून काढता पाय घेतला आहे. सततच्या ट्रोलिंगला वैतागून त्यांनी हे पाऊल उचलले होते. त्यामुळे करणने देखील या ट्रोलिंगमुळे हे पाऊल उचलले आहे का अशी चर्चाही सध्या रंगू लागली आहे.

सध्या करण जोहर त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) चित्रपटाला (Movie) मिळालेल्या यशाचा आनंद घेत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची जोडी असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींच्या पुढे कमाई केली आहे. ब्रह्मास्रच्या घवघवीत यशानंतर करण जोहर सध्या त्याचे दिग्दर्शन असलेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या रिलीजची तयारीत व्यस्त असून रणवीर सिंग आणि आलिया भट्ट या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवारांनी बैठक रद्द का केली? कोणता दलाल आडवा आला? – नाना पटोलेंचा विधानसभेत घणाघात| VIDEO

Pimpri Chinchwad : महापारेषणचा बिघाड; महावितरणच्या ५२ हजार वीजग्राहकांना फटका, पिंपरी परिसरात रात्रीपासून अंधार

Maharashtra Live News Update : चार्जरच्या वायरनं नवऱ्याने केला बायकोचा खून, नवऱ्याने स्वत:लाही संपवलं

Political News : 'शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं, आधी...'; वसंत मोरे यांचं खासदार दुबे यांना ओपन चॅलेंज

Pandharpur: चंद्रभागेत आंघोळ अन् धरली पंढरीची वाट, विठुरायाच्या दर्शनाआधीच हार्ट अटॅकनं मृत्यू; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT