Shehjada Film Review Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shehjada Film Review: रोमान्स, ॲक्शन अन् कॉमेडी... असा आहे कार्तिकचा शेहजादा

कार्तिक आर्यनचा 'शहजादा'च्या रुपात चाहत्यांसाठी 'फुल टू मसाला' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. आता कार्तिकचा हा नवा ॲक्शन अवतार त्याच्या चाहत्यांना कितपत आवडतो हे बॉक्स ऑफिसच सांगेल.

Chetan Bodke

चित्रपट- शेहजादा

कलाकार- कार्तिक आर्यन, कृति सेनन, परेश रावल, मनीषा कोईराला, रॉनित रॉय

दिग्दर्शक- रोहित धवन

स्टार्स- तीन

Shehjada Film Review: कार्तिक आर्यनचा 'शहजादा'च्या रुपात चाहत्यांसाठी 'फुल टू मसाला' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. आता कार्तिकचा हा नवा ॲक्शन अवतार त्याच्या चाहत्यांना कितपत आवडतो हे बॉक्स ऑफिसच सांगेल. चला तर एक नजर टाकूया चित्रपटाच्या कथेवर...

जिंदाल एंटरप्रायझेसचे मालक रणदीप जिंदाल (रोनित रॉय) आणि त्यांच्या कंपनीत काम करणारा कर्मचारी बाल्मिकी (परेश रावल)च्या घरी मुलाचा जन्म होता. काही कारणास्तव वाल्मीकी आणि जिंदाल कंपनीचे मालक रणदीप यांच्या मुलांची अदलाबदल करण्याचा निर्णय होतो. अशा परिस्थितीत, जिंदाल कंपनीचा एकुलता एक राजकुमार बंटू (कार्तिक आर्यन) हा कारकूनाचा मुलगा म्हणून राहतो तर कारकूनाचा मुलगा राज (राठी) जिंदालच्या राजघराण्यात मोठ्या थाटात राहतो.

नोकरीच्या शोधात असलेल्या बंटूला समारा (क्रिती सॅनन) भेटते. समाराच्या बॉस म्हणून पाहून बंटू तिच्या प्रेमात पडतो. दरम्यान, तिला वाल्मिकीचे हे घृणास्पद सत्यही कालांतराने कळते. त्यानंतर चित्रपटातील कथेला एक वेगळाच ट्वीस्ट मिळतो. बंटू जिंदाल कुटुंबासमोर त्याचे सत्य उघड करू शकेल का? त्यात, कुटुंब बंटूला दत्तक घेण्यास तयार आहे का? समारा आणि बंटूच्या प्रेमकथेचे काय होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट थिएटरमध्येच पाहायला मिळेल.

देसी बॉईज, ढिशूम यांसारख्या चित्रपटानंतर रोहित धवनने शेहजादाचे दिग्दर्शन केले आहे. शहजादा हा एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे, जो 80 च्या दशकातील बॉलिवूडच्या काही चित्रपटाची आठवण करून देतो. रोहितने 80 च्या दशकातील कथा आजच्या लेटेस्ट चित्रपटात देण्याचा प्रयत्न केला आहे. रोहितच्या चित्रपटात मनोरंजनाचा डोस योग्य प्रमाणात आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करण्याचा प्रयत्नही केलेला नाही आणि कोणतीही गोष्ट कमी ठेवली नाही. हा चित्रपट पुर्णपणे रिमेक असून त्यात रोहितची हटके कलाकृतीही प्रेक्षकांना स्पष्टपणे दिसत आहे. दिग्दर्शकांनी चित्रपट बनवताना साऊथमधील अनेक सीन्स बरेच स्पेशल केले आहे.

चित्रपटाच्या इंटर्व्हलबद्दल बोलायचे तर, चित्रपट बराच मोठा दिसतो आणि काही दृश्ये विनाकारण दाखवण्यात आली आहे, यावरून निर्मात्याचा निष्काळजीपणा दिसून येतो. आणि इंटर्व्हलनंतर चित्रपटाच्या कथेने खूपच स्पीड घेतला आहे. विशेषत: चित्रपटातील वन लाइनर्स आणि कॉमिक पंच त्याचा दुसरा अर्धा भाग मनोरंजक बनवतात. कार्तिक आर्यनचा नेपोटिझमवरील एकपात्रीचा सीन खरोखरच चांगला होता.

चित्रपटाचा क्लायमॅक्स प्रेक्षकांना एका वेगळ्या टप्प्यावर घेऊन जात आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध कार्तिक आणि क्रितीच्या रोमान्सवर केंद्रित असताना, शेवटी ते संपूर्ण कौटुंबिक नाटकात बदलते. शेवटच्या 30 मिनिटांत क्रिती सॅनन अनुपस्थित राहिली, जे पाहून क्रितीच्या चाहत्यांची नक्कीच निराशा होईल. जर तुम्ही चित्रपटाची मूळ आवृत्ती पाहिली नसेल, तर हा चित्रपट तुमची निराशा करणार नाही, असा दावा केला जात आहे.

मुळ चित्रपटाचे संगीत प्रेक्षकांना फारसे आवडले नसून कार्तिकच्या या चित्रपटातील एक नवं गाणं प्रदर्शित झालं होतं. रिलीजच्या काही दिवस आधी कार्तिकने 'धीला' हे गाणे रिलीज केले आहे. ते थोडं लवकर रिलीज झालं असतं तर कदाचित गाण्याला अजून चांगली पसंदी मिळाली असती. सिनेमॅटिकली चित्रपट खूपच सुंदर दिसतो. पडद्यावरच्या भव्यतेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. एडिटिंगकडे थोडं लक्ष दिलं असतं तर २ तास ४६ मिनिटांचा हा चित्रपट जरा जास्त खुसखुशीत होऊ शकला असता. चित्रपटातील अॅक्शनचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कार्तिकची स्टाइलिंग आणि अॅक्शन दोन्ही टॉप क्लास आहे.

चित्रपटाचे संपूर्ण कास्टिंग हा त्याचा प्लस पॉइंट आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनने स्वतःला एंटरटेनर म्हणून एक्सप्लोर केले आहे. अ‍ॅक्शन, रोमान्स, कॉमेडी आणि थोडेसे इमोशन, कार्तिकने पडद्यावरचे प्रत्येक सार उत्तम प्रकारे जपले आहे. ते कमी-जास्त कुठेही दिसले नाहीत. त्याचबरोबर वकील म्हणून क्रिती सॅननचे कामही उत्तम आहे. 'नहले पे देहले' या चित्रपटात कार्तिकसोबत परेश रावलची बाल्मिकीची जोडी एकदम छान आहे. मनीषा कोईराला आणि रोनित रॉय त्यांच्या भूमिकांमध्ये खूपच आरामदायक वाटतात. याशिवाय राजपाल यादव काही सीन्समध्ये दिसला असेल पण त्याची कॉमिक टायमिंग अप्रतिम आहे.

तुम्ही चित्रपटात जास्त लॉजिक शोधले तर तुमची निराशा होईल, पण निव्वळ मनोरंजनाच्या उद्देशाने चित्रपट पाहिला तर चित्रपट उत्तम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये भूकंप, राष्ट्रवादीला हादरे? भाजपने पवारांना पुन्हा घेरलं? सुळेंसोबत दादांनाही गाठलं खिंडीत?

Ind Vs Eng : तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाच बाजी मारणार, एजबॅस्टननंतर लॉर्ड्सवरही इंग्लंडचा संघ फेल होणार; फक्त...

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेतून वाचला विश्वास कुमार, पण मानसिक धक्क्याने हदरला

Itchy Nose Relief: नाकात वारंवार खाज येते? 'या' उपायांनी घरच्या घरी सहज आराम मिळवा

Skin Care: मेकअपशिवाय मिळवा नेचरल पिंक ग्लो, फोलॉ करा या टिप्स

SCROLL FOR NEXT