Tum Kya Mile Song Out Instagram
मनोरंजन बातम्या

Rocky Aur Raani Ki Prem Kahani मधलं पहिलं रोमॅंटिक गाणं प्रदर्शित, Tum Kya Mile मध्ये दिसला आलिया- रणबीरचा जबरदस्त रोमान्स

Rocky Aur Raani Ki Prem Kahani Romantic Song Out: चित्रपटाच्या टीझरनंतर आता सोशल मीडियावर चित्रपटातील पहिलं रोमँटिक गाणं प्रदर्शित झालं आहे.

Chetan Bodke

Tum Kya Mile Song Out: ‘रॉकी और राणी की प्रेमकहाणी’ निर्मित करण जोहरचा हा चित्रपट देखील एक चर्चित चित्रपटांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता टीझरनंतरच चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या ९०च्या दशकातील आठवणी जागा झाल्या आहेत. या गाण्याचे नाव ‘तुम क्या मिले’ असे असून हे चित्रपटातील पहिलंच गाणं आहे. यामध्ये आलिया आणि रणवीरचा जबरदस्त रोमान्स पाहायला मिळत आहे.

‘तुम क्या मिले’ हे गाणं अर्जित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गाणं गायलं असून गाण्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. दोघांचाही या गाण्यात खूपच खास लूक असून त्यांनी काश्मीरच्या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये रोमान्स करताना दिसत आहे. या गाण्याने प्रेक्षकांच्या ९० च्या दशकातील आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे. बर्‍याच दिवसांनंतर अर्जित सिंग, अमिताभ भट्टाचार्य आणि प्रीतम हे तिघे ‘तुम क्या मिले’ गाण्यासाठी एकत्र आले आहेत. यापूर्वी हे तिघेही ‘ए दिल है मुश्किल’ मध्ये चन्ना मेरेया या गाण्यासाठी एकत्र दिसले होते.

या गाण्याबाबत करण जोहर म्हणतो, “लव्ह साँग नेहमीच एक आव्हानात्मक काम आहे. धर्मा प्रॉडक्शनची लव्ह साँग हे नेहमीच जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. मला आठवतंय की आम्ही ‘रॉकी और राणी की प्रेमकहाणी’ च्या गाण्याचं शूटिंग हे अखेरचं होतं. कारण हे गाणं कसं शूट होणार याची मला जरा चिंता होती. अखेर हे गाणं प्रेक्षकांच्या पसंदीस उतरले आहे. याचा मला आनंद झाला आहे. ‘तुम क्या मिले’ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंदीस उतरेल याची मला शाश्वती आहे.”

करण जोहरला बॉलिवूडमध्ये डेब्यू करून २५ वर्ष झाले असून त्यामुळे करणसाठी हा चित्रपट खूपच खास ठरला आहे. आलिया आणि रणवीर सिंग व्यतिरिक्त या चित्रपटात धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, रोनित रॉय, अर्जुन बिजलानी, क्षिती जोग, भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया दिसणार आहेत. त्याचबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पक्ष वाढवणार की संपवणार आहात? शिंदेंनी टोचले पालकमंत्र्यांचे कान, बैठकीत नेमकं काय झालं?

Ramayana Collection: 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; ५ दिवसांत ५०० कोटींचा टप्पा पार, 'या' चित्रपटांचा रेकॉर्ड केला ब्रेक

Burn First Aid : दिवाळीत भाजल्यावर बर्फ, टूथपेस्ट लावता? ही चूक करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला वाचा

Maharashtra News Live Update: गिरगाव चौपाटीवर छटपूजेला न्यायालयाचा नकार

गोकुळमधील २५ वर्षांची 'महाडिक सत्ता' संपली? यंदा त्या पॅटर्नला ब्रेक, अध्यक्षपदासाठी ४ नावं चर्चेत; कुणाची लागणार वर्णी?

SCROLL FOR NEXT