Mr And Mrs Mahi Saam Tv
मनोरंजन बातम्या

स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या 'Mr And Mrs Mahi' थिएटरमध्ये रिलीज, चाहत्यांकडून चित्रपटाचे कौतुक

Mr And Mrs Mahi Twitter Review : शरण शर्मा दिग्दर्शित 'मिस्टर अँड मिसेस माही' आज (३१ मे) थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता होती.

Chetan Bodke

शरण शर्मा दिग्दर्शित 'मिस्टर अँड मिसेस माही' आज (३१ मे) थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता होती. अखेर चित्रपट रिलीज झालेला आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत जान्हवी कपूर आणि राजकुमार राव आहे. सध्या दोघांच्याही अभिनयाचे नेटकरी कौतुक करीत असून चाहत्यांनी कथेला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. जाणून घेऊया, प्रेक्षकांनी चित्रपटाला कशाप्रकारे प्रतिसाद दिलेली आहे.

चित्रपटाचे कथानक जयपूरमध्ये राहत असलेल्या एका कपलवर आधारित आहे. राजकुमार रावने महेंद्र हे पात्र साकारले आहे तर जान्हवी कपूरने माहीचं पात्र साकारलं आहे. महेंद्र आणि माहीची लव्हस्टोरी प्रेक्षकांना भावली असून चाहते सध्या चित्रपटाचे जोरदार कौतुक करीत आहेत. अनेक युजर्सने चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. एक युजर म्हणतो, "हा चित्रपट नक्कीच क्रिकेटप्रेमींना आवडेल. माही आणि महेंद्रची लव्हस्टोरी माझ्याप्रमाणेच तुम्हालाही आवडेल.", तर आणखी एकाने "मॅच मेड इन हेवन" अशी प्रतिक्रिया दिली.

तर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीही चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे. "हृदयस्पर्शी कथा, स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटामध्ये राजकुमार आणि जान्हवीचा दमदार अभिनय. आवर्जुन पहावा असा चित्रपट..." तर आणखी एक युजर बोलतो, "खूप सुंदर चित्रपट, क्रिकेटवर आधारित चित्रपट नाही. हृदयस्पर्शी कथाअसून माही आणि महेंद्रची अप्रतिम लव्हस्टोरी आहे. दमदार अभिनय राजकुमार आणि जान्हवी" अशी प्रतिक्रिया युजर्सने केलेली आहे. अनेकांनी चित्रपटाला ३ ते ३.५ इतके स्टार्स दिलेले आहेत. जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्याशिवाय चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, राजेश शर्मा, कुमुद मिश्रा, जरीना वहाब आणि पूर्णेंदू भट्टाचार्य महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीला पुन्हा ऊत, पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांची 'बॉक्सिंग'

SCROLL FOR NEXT