बॉलिवूड निर्माता- दिग्दर्शक करण जोहर कायमच सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर तो आपलं परखड आणि स्पष्ट मत मांडण्याचा प्रयत्न करतो. सध्या करण जोहर त्याच्याच 'कॉफी विथ करण'च्या ८व्या सीझनमुळे तुफान चर्चेत आला आहे. त्याच्या ह्या शोमध्ये नुकतंच सैफ अली खान आणि त्याची आई अभिनेत्री शर्मिला टागोरने हजेरी लावली होती. आपल्या शोमुळे कायमच ट्रोल होणारा करण जोहर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. (Bollywood)
करण जोहर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. नुकतंच करण जोहरला एका नेटकऱ्याने आईचा टाइमपास व्हावा यासाठी सुनेला घरी आण, या कमेंटवर करण चांगलाच संतापला आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत ट्रोलर्सला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. करणला एक युजर म्हणतो, 'आईसाठी सून आण, तिचा टाईमपास होत नाही.' त्या कमेंटवर उत्तर देत करण जोहरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली आहे. करणच्या म्हणण्यानुसार सून म्हणजे टाइमपाससाठीचे साधन नाही. याच गोष्टीचं स्पष्टीकरण देत करणने त्या युजरची चांगलीच कानउघडणी केली. (Bollywood Actor)
“माझ्या पर्सनल लाईफमध्ये केलेल्या निवडीमुळे ट्रोलिंग करणारे आणि मला शिव्या देणारे मला हे ट्रोलर्स जास्त गंभीर वाटतात. मला या कमेंट्स खूप वाईट वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे, सूनही कोणत्याही आईसाठी टाईमपास नसते. लोकं फक्त तिच्याकडे सामान म्हणूनच पाहतात. सून सुद्धा एक माणुसच आहे. सून तिचा वेळ वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या आपल्या आवडी निवडीप्रमाणे वेळ घालवण्याचा अधिकार आहे.” (Social Media)
“सोबतच, मी सर्वांना सांगू इच्छितो की, मी आणि माझी आई माझ्या मुलांची काळजी घेतो. तिला कोणत्याही टाइम पासची गरज नाही. आणि तिला कोणत्याही टाईमपासची गरज नाही, तिचे आयुष्य आम्हाला प्रेम देण्यात पूर्ण आहे. आम्ही देखील तिच्यावर तितकेच प्रेम करतो आणि 'सून' आणणे हा पर्याय नाही आहे. मी हे त्यांना सांगतोय, ज्यांना माझ्या पर्सनल लाईफची जास्त काळजी आहे. माझ्या आईने मला आणि माझ्या मुलांना योग्य मार्गदर्शन दिलं आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. भविष्यात माझ्या आयुष्यात कोणी जोडीदार आलाच तर मी त्याला माझ्या आयुष्यातला एकटेपणा दूर करायला सांगेन. माझे ऐकल्याबद्दल धन्यवाद.” सध्या अभिनेत्याचीही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.