Bawaal Teaser Shared Social Media Instagram
मनोरंजन बातम्या

Bawaal Teaser: गोड नात्याचा थरारक शेवट; वरुण-जान्हवीच्या 'बवाल'चा टीझर प्रदर्शित

Chetan Bodke

Bawaal Teaser Shared Social Media: वरुण धवन बॉलिवूडमध्ये लव्हर बॉय म्हणून ओळखला जातो. तर जान्हवी कपूर धडक गर्ल म्हणून ओळखली जाते. या दोघांची लव्ह स्टोरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वरुण-जान्हवी ही नवीन जोडी 'बवाल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

'बवाल' चित्रपटातून वरुण-जान्हवीची फ्रेश जोडी एकत्र झळकणार आहे.या चित्रपटामुळे हे दोघही खूप चर्चेत आहेत.नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.टीझरने मात्र सर्वांचंच लक्ष वेधून घेतले आहे.

टीझरमध्ये सुरवातीला वरुण जान्हवीला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत आहे.त्यानंतर त्यांच्यातील गोड केमिस्ट्री पाहायला मिळाते. त्यानंतर जान्हवी कपूर एक डायलॉग बोलते. ती म्हणते,'या नात्याला समजून घ्यायला मी एवढा वेळ लावला की, सर्व संपत चाललंय'. जान्हवीच्या या डायलॉगने मात्र धक्काच बसतो.

टीझरमध्ये एका सीनमध्ये जान्हवी वरुणला कानाखाली मारते. त्यानंतर एका गाडीत बसून जान्हवी कुठेतरी जाताना दिसते. गाडीच्याच बाजूला वरुण उभा असतो.टीझरमध्ये शेवटी एक ट्वीस्ट पाहायला मिळतो. वरुण आणि जान्हवी हे दोघेही एका चेंबरमध्ये विचित्र माणसांसोबत अडकलेले दिसतात. ते एकामेंकाना मोठ्याने आवाज देत असतात. अशा या गोड प्रेमकहाणीचा हृदयाला चटका लावणारा शेवट होताना टीझरमध्ये दाखवलं आहे. (Bollywood Film)

या टीझरची सर्वात खास गोष्ट म्हणजे, टीझरमध्ये सुरवातीपासूनच अरजित सिंहच्या आवाजातील 'तुम्हें कितना प्यार करते हैं' हे रोमांटिक गाण ऐकायला मिळतं. बवालच्या टिझरला अरजित सिंहच्या गाण्याने अजूनच छान बनवलं आहे. (Entertainment News)

वरुण-जान्हवीच्या 'बवाल' चित्रपटाच्या टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रेक्षकांनी टीझरला खूप प्रतिसाद दिला आहे. ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर काय जादू करते? हे पाहक रंजक ठरणार आहे. चित्रपटात वरुण अजय तर जान्हवी निशा हे पात्र साकारत आहे. 'बवाल' चित्रपट २१ जुलैला 'ॲमेझॉन प्राइम' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT