Prabhas Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prabhas: प्रभासची प्रकृती बिघडली, अभिनेत्याच्या 'या' बिगबजेट चित्रपटाच्या शूटिंगलाही लागला ब्रेक...

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासची तब्येत बिघडल्याने 'आदिपुरुष' चित्रपटाचं शूटिंग थांबवावं लागत असल्याचं सांगण्यात येत आहे.

Chetan Bodke

Prabhas Health Update: साऊथ चित्रपटांचा सुपरस्टार प्रभासबद्दल मोठी बातमी येत आहे, त्यामुळे त्याचे चाहते थोडे चिंतेत आहेत. वास्तविक, प्रभासची तब्येत अचानक बिघडल्याचे बोलले जात आहे, त्यानंतर त्याच्या आगामी 'आदिपुरुष' चित्रपटाचे शूटिंग थांबवावे लागले आहे. आता प्रभासची ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच प्रभासची तब्येत अचानक बिघडली आहे. प्रभासला खूप ताप आल्यामुळे त्याला आरोग्याच्या समस्या उद्भवल्या. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. आता तपासणीनंतर डॉक्टरांनी प्रभासला काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. याच कारणामुळे 'आदिपुरुष'चे शूटिंग काही काळ पुढे ढकलण्यात आले आहे.

प्रभास पूर्णपणे बरा झाल्यानंतरच ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटाच्या शुटिंगसाठी परतणार असल्याचे कळत आहे. आता ही बातमी समोर येताच सुपरस्टारच्या चाहत्यांनी त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. प्रभासने 'बाहुबली' आणि 'बाहुबली 2' या चित्रपटांतून चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं. यामुळे त्याचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात आहे.

विशेष म्हणजे क्रिती सेननसोबत 'आदिपुरुष'च्या माध्यमातून प्रभाससोबत पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सैफ अली खानही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रभासचे या वर्षात दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात 'केजीएफ' चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांचा 'सालार' आणि दिग्दर्शक नाग अश्विनचा 'प्रोजेक्ट के' यांचा समावेश आहे. यानंतर प्रभास प्रशांत नीलच्या 'सालार'मध्ये दीपिका पदुकोणसोबत 'प्रोजेक्ट के' नावाच्या चित्रपटातही दिसणार आहे.

'आदिपुरुष' चित्रपट येत्या 16 जून 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित होताच चित्रपटाला सर्वच स्तरातून कमालीचा नकार सहन करावा लागला होता. चित्रपटात प्रभासनं रामाची भूमिका तर कृती सेननने सीतेची आणि सैफ अली रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये 'आदिपुरुष' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT