The Kashmir Files
The Kashmir Files Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vivek Agnihotri: काश्मिर फाईल्सला 'कचरा' म्हणणाऱ्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकांना विवेक अग्निहोत्रींचे प्रत्युत्तर...

Chetan Bodke

Vivek Agnihotri: 2022 या वर्षात सर्वाधिक चर्चेत राहिलेला चित्रपट म्हणजे, 'द काश्मीर फाईल्स'. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवला होता. सध्या हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चर्चेचे कारण म्हणजे, लेखक व दिग्दर्शक सईद अख्तर मिश्रा यांनी केलेल्या एका विधानावरून.

पटकथा लेखक आणि प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला अमूल्य योगदान दिले आहे. 'नसीम' आणि 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यो आता हैं' हे चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहिले. त्याचबरोबर ‘नुक्कड’ व ‘इंतजार’ सारख्या मालिकेंचेही त्यांनी दिग्दर्शन केले. पण सध्या सईद ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाबाबत केलेल्या विधानामुळे चर्चेत आहेत.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या चित्रपटावर बरेच टीकेचे बाण सोडले आहे. चित्रपटाविषयी सईद म्हणतात, 'माझ्यासाठी 'द काश्मिर फाईल्स' हा चित्रपट म्हणजे कचरा आहे. पण कश्मिरी पंडितांच्या असलेल्या समस्या म्हणजे कचरा आहे का? तर असं नाही. त्यांच्या खरंच त्या समस्या आहेत.'

'पण हे फक्त कश्मिरी हिंदूंनाच सहन करावे लागते का? नाही हे तिथल्या कश्मिरी मुस्लिमांनाही सहन करावे लागते. गुप्तचर संस्था, राष्ट्रीय हित संबंध असलेले राष्ट्र आणि सीमेपलीकडून पगार घेणारे लोकं, जे सतत गोंधळ निर्माण करत आहेत, या सगळ्यांच्या षडयंत्रात अडकले आहेत. मुद्दा बाजू घेण्याचा नाही. माणूस व्हा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा.'

सईद यांच्या या वक्तव्यावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपले उत्तर दिले आहे. अग्निहोत्री यांनी उत्तर ट्विटच्या माध्यमातून दिले असून ते ट्विटमध्ये म्हणतात, “मी म्हणालो मिर्झा साहेबांना सलाम. ‘द दिल्ली फाइल्स’नंतर पुन्हा भेटूच. २०२४.” ट्विट शेअर करताना विवेक अग्निहोत्रींनी सईद मिर्झा यांच्या वक्तव्याचा स्क्रिनशॉटही शेअर केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunny Leone: काळा ड्रेस, मोकळे केस; सनीचा बोल्ड अंदाज करतोय घायाळ

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून महिला भाविकास धक्काबुक्की

Mumbai Indians Playing XI: हैदराबादविरुद्ध अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार? पाहा कशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Solo Travel Tips: एकट्याने फिरायला जाण्याची आवड आहे;मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Baramati Constituency: हे चार विधानसभा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT