The Kashmir Files
The Kashmir Files Saam Tv
मनोरंजन बातम्या

Boycott Trend: बॉलिवूडवरील बॉयकॉट ट्रेंडला 'द कश्मीर फाइल्स'च्या दिग्दर्शकाचा पाठिंबा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक चित्रपटांनी यावेळी चांगलाच सपाटून मार खाल्ला आहे. पण काही चित्रपटांना हा ट्रेंड अपवाद ठरला आहे. अशाच बॉयकॉट ट्रेंडला (Boycott) अपवाद ठरलेला चित्रपट म्हणजे 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) . या चित्रपटाने चांगलीच रेकॉर्डब्रेक कमाई (Box Office Collection) केली आहे. कश्मिर खोऱ्यात झालेल्या कश्मिरी पंडितांवर करण्यात आलेले अमानुष अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. दिग्दर्शकांनी चित्रपटातील आशय चांगल्या पद्धतीने मांडला आहे. अनेक विषयांवर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आपले मतं मांडत असतात. तसेच सध्या सर्वात जास्त ट्रेंडिगला असलेल्या 'बॉयकॉट बॉलिवूड' या विषयावर विवेक अग्निहोत्रीने आपले मत मांडले आहे.

ट्रेंडवर विवेक अग्निहोत्री (Director Vivek Agnihotri) आपले मत व्यक्त करताना म्हणाला, 'हा मुद्दा खूप अवघड आहे पण तेवढाच चांगला मुद्दा आहे. या ट्रेंडमार्फत आपले मत व्यक्त करत प्रेक्षकांना नक्की काय हवंय हे तरी समजेल. यामार्फत खूप शिकण्यासारखे आहे. तसेच हे सांस्कृतिक बंड बॉलिवूडविरुद्धचे आहे. विवेकने अशा बॉलिवूडचा भाग नसल्याचे मत व्यक्त केले आहे. या ट्रेंडने नक्कीच परिणाम खूप सकारात्मक असेल. मी सध्याच्या बॉलिवूडचा भाग नाही ज्यात प्रचलित असलेले फॉर्म्युले वापरले जातात. उलट मी यातून बाहेर पडत वेगळ्या हिंदी चित्रपटाचा आशय बनवण्याचा प्रयत्न करतो.'

अमिर खानचा बहुचर्चित 'लाल सिंह चड्ढा' चित्रपट बॉयकॉट ट्रेंडमुळे खास कमाई करु शकला नव्हता त्यावर मत व्यक्त करताना विवेक म्हणाला की, अमिर खानचा 'दंगल' चित्रपटावर बहिष्कार टाकला होता तरीही त्या चित्रपटाने कोट्यावधींची कमाई केली होती. मी कोणाच्याही विरोधात नाही. मला फक्त सिनेसृष्टीत बदल घडवायचा आहे. कलाकारांकडे फक्त लक्ष न देता, प्रेक्षकांनी आपले कथा आणि लेखनाकडे लक्ष केंद्रीत करायले हवे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने पुन्हा एकदा बॉलिवूडवर खडसून टिका केली आहे. विवेक म्हणतो, 'बॉलिवूड सामान्य प्रेक्षकांना समजून घेत नाही. बॉलिवूडला काही ट्रोलर्स प्रतिभेचे कब्रस्तानही म्हणतात. सातत्याने फ्लॉप होणाऱ्या मोठ्या चित्रपटांवरही विवेकने वक्तव्य केले होते. 'बॉलिवूड जसे दिसते, तसे नाही. इथे स्वप्न चिरडतात' विवेकने त्याचे हे मत पोस्ट शेअर करत मांडले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: दाभोसा धबधब्यात पोहण्यासाठी गेला, १२० फुटावरून उडी मारली अन् डोहात बुडाला; तरुणाचा भयानक मृत्यू

Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT