Abhishek- Aishwarya  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Abhishek- Aishwarya : All Is Well! अभिषेक एअरपोर्टवर कुटुंबासोबत स्पॉट; ऐश्वर्याने मराठीत साधला संवाद, Video Viral

Abhishek- Aishwarya Viral Video : बॉलिवूड कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. तसेच ऐश्वर्याने एअरपोर्टवर मराठीत संवाद साधला आहे. ती नेमकं काय बोली, जाणून घ्या.

Shreya Maskar

खूप काळापासून अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा पाहायला मिळत होत्या. नेहमी ऐश्वर्या लेक आराध्यासोबत स्पॉट होत असे आणि अभिषेक बच्चन आपल्या कुटुंबासोबत दिसायचा. ते लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या देखील सोशल मीडियावर रंगल्या होत्या.

आता मात्र अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या, अभिषेक आणि त्यांची लेक आराध्या (aaradhya bachchan) पाहायला मिळत आहेत आणि तिघेही खूप खुश पाहायला मिळत आहे. त्यांच्या या व्हिडीओमुळे त्यांच्यात सर्व आलबेल असल्याचे बोले जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या न्यू इयरसाठी परदेशात गेले होते. तेव्हा परदेशातून मुंबई एअरपोर्टवर त्यांना सहकुटुंब स्पॉट करण्यात आले. या वेळी ऐश्वर्या आणि आराध्याने पापाराझींशी संवाद देखील साधला. त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या दरम्यान ऐश्वर्या राय मराठीत 'चला चला' असे पापाराझींना म्हणताना दिसली.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील अभिषेकच्या एका कृतीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अभिषेकने बायकोसाठी कारचा दरवाजा उघडला आणि तसेच तिला कारमध्ये बसायला मदत देखील केली. हा व्हिडीओ पाहून नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. यांना एकत्र पाहून चाहत्यांना खूप आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन याआधी आराध्याच्या शाळेतील ॲन्युअल डे ला एकत्र स्पॉट झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC elections : मी मोदींचा भक्त, मुंबईवर भाजपचं कमळ फुलणारच, महेश कोठारे काय म्हणाले?

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

SCROLL FOR NEXT