Cm Eknath Shinde Home Visit Bollywood Celebrity Instagram
मनोरंजन बातम्या

Cm Shinde Ganpati Inside Videos: मुख्यमंत्री शिंदेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी, Video व्हायरल

Ganesh Chaturthy 2023: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Chetan Bodke

Cm Eknath Shinde Home Visit Bollywood Celebrity

फक्त मुंबईतच नाही तर अवघ्या राज्यभरात सध्या गणेशोत्सवाचा (Ganesh Festival) आनंद दिसून येत आहे. लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटी जाताना आपल्याला दिसून येत आहे. सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पा (Ganpati Bappa) बसवण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी काल संध्याकाळी संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीने हजेरी लावली होती. यावेळी बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) आणि 'सुलतान' म्हणजेच सलमान खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गायिका आशा भोसले, सलमान खान, बहिण अर्पिता, शाहरुख खान, कार्तिक आर्यन, एकता कपूर, शिल्पा शेट्टी, अमिषा पटेल, रुपाली गांगुली,एल्विश यादव,सुनिल ग्रोव्हर,जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, पूजा हेगडे अशा दिग्गज कलाकारांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली होती. (Bollywood Actor)

यावेळी सर्वच सेलिब्रिटी भक्तीत तल्लीन होताना दिसले. सध्या सर्वच सेलिब्रिटींचे दर्शन घेतानाचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच सेलिब्रिटींचे श्रीफळ, शाल आणि पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यासोबतच मुख्यमंत्र्यांकडून सर्व सेलिब्रिटींना बाप्पाची मूर्तीही भेट म्हणून देण्यात आली. (Ganeshotsav)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांची तब्बेत बिघडली, वृंदावनमधील पदयात्रा रद्द

Govinda : गोविंदाच्या इव्हेंटमध्ये राडा! बाउन्सरने धक्काबुक्की केल्याने वाद चिघळला, VIDEO व्हायरल

Chole Bharture Recipe: स्ट्रीट स्टाईल चमचमीत छोले भटुरे बनवायचेत; फॉलो करा ही स्टेप बाय स्टेप रेसिपी

Bharli Gilki Recipe: गिलक्याची भाजी आवडत नाही? मग एकदा ट्राय करा झणझणीत भरली गिलकी, शुन्य मिनिटांत जेवण होईल फस्त

Balushahi Recipe: झटपट घरीच बनवा खुसखुशीत आणि रसाळ बालूशाही, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT