Orry Entered To Bigg Boss 17 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Orry Entered To Bigg Boss 17: आता जाळ अन् धुर संगटच... ‘बिग बॉस १७’ मध्ये ओरी येणार?, ‘वीकेंड का वार’ मध्ये होणार धमाका!

ORRY In Bigg Boss 17: कायमच स्टारकिड्ससोबत दिसणारा ओरी लवकरच ‘बिग बॉस १७’ मध्ये दिसणार आहे.

Chetan Bodke

Orry Entered To Salman Khan Bigg Boss 17 Show

सोशल मीडियावर कायमच स्टारकिड्सची चर्चा होते. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर दिवाळी पार्टीतले फोटो तुफान व्हायरल झाले होते. त्या पार्टीमध्ये अनेक स्टारकिड्स आणि सेलिब्रिटींसोबत एक कॉमन मॅन स्पॉट झाला होता. त्याची आणि बॉलिवूडमधल्या सर्वच स्टारकिड्सची खास फ्रेंडशिप आहे.

त्याचं ‘ओरी’ असं नाव आहे. अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये तो स्पॉट सुद्धा झाला होता. जरीही तो बॉलिवूडमध्ये सक्रिय नसला तरी तो ‘बिग बॉस १७’ मध्ये दिसणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ओरी बॉलिवूडमध्ये नाही. तरीही सुद्धा तो ‘बिग बॉस १७’ मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची शक्यता आहे. या संबंधितचे वृत्त ‘बिग बॉस तक’ने दिलेले आहे. या सोशल मीडिया पेजवरुन चाहत्यांना बिग बॉसविषयीचे अपडेट्स मिळत असतात. येत्या ‘विकेंड का वार’मध्ये तो बिग बॉसच्या घरामध्ये येण्याची शक्यता आहे. ओरी बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार की नाही?,याचे उत्तर चाहत्यांना येत्या शनिवारीच मिळणार आहे.

तो आतापर्यंत अनेक स्टारकिड्ससोबत दिसला आहे. त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत देखील जोडले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी आणि त्यांची लेक ईशा अंबानींसोबतही त्याचा फोटो आहे.

न्यासा देवगण, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, सारा अली खान, शनाया कपूर, कतरिना कैफ या सर्व स्टार किड्ससोबत त्याची खास मैत्री आहे. त्याचे क्रिकेट कनेक्शनही आहे. आता बिग बॉसच्या घरात ओरी एण्ट्री करणार असल्याने त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. (Bollywood)

ओरीचं पूर्ण नाव ओरहान अवत्रमणी असं आहे. ओरी हा एका बड्या उद्योगपतीचा मुलगा असून तो अनेकदा स्टारकिड्ससोबत पार्ट्यांमध्ये स्पॉट झाला आहे. ओरहान हा ॲनिमेटर आहे. टॉप फोर्ड, व्हिजन ऑफ सूपर आणि प्राडासारख्या मोठ्या ब्रँडसोबत त्याचे कनेक्शन आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT