Ananya Pandey-Aditya Roy Kapoor Are Dating Each Other? Saam TV
मनोरंजन बातम्या

Bollywood Couples: आता अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरचा नंबर, कारण करण जोहरने भाकीत केलंय

करण जोहरनेही अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल एक हिंट दिली आहे.

Pooja Dange

Ananya Pandey-Aditya Roy Kapoor Spotted Together: बॉलिवूड कलाकारांचे कधी सूत जुळेल आणि कधी फिस्कटेल काही सांगता येत नाही. सध्या बी-टाऊनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर स्पॉट झाले होते. दोघे पार्टीलाही एकत्र पोहोचले होते, तेव्हापासून त्यांच्याविषयीच्या बातम्यांनी आणखी जोर शरला आहे.

तर अनन्याने आदित्य रॉय कपूरच्या 'द नाईट मॅनेजर' या वेबसीरीजच्या प्रीमियरलाही हजेरी लावली होती. करण जोहरनेही या दोघांच्या नात्याबद्दल एक हिंट दिली आहे.

करण जोहरने त्याच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअरबद्दल सर्वात आधी एक इशारा दिला होता. माझ्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत मी अनन्या आणि आदित्य यांच्यातील उत्तम केमिस्ट्री पाहिली, असे करणने म्हटले होते. यानंतर जुलै 2022 मध्ये अनन्या आणि आदित्यच्या अफेअरची चर्चा सुरू झाली.

कॉफी विथ करणमध्ये एका गेम दरम्यान करणने अनन्याला एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचे उत्तर देताना अनन्यानेच आदित्य रॉय कपूरला हॉट म्हटले होते.

आदित्य आणि अनन्या, मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले. ब्लॅक आउटफिटमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते. डिसेंबर 2022 मध्येही दोघे एकत्र दिसले होते. तेव्हा ते दोघे 'FIFA वर्ल्ड कप 2022' पाहण्यासाठी कतारला गेले होते.

सिड-कियाराच्या रिसेप्शनमध्ये एकत्र पोज दिल्यानंतर अनन्या आणि आदित्य रॉय कपूर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अनन्याने काळ्या रंगाची साडी नेसली होती. तर आदित्य काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत होता. दोघांची जोडी खूप छान दिसत होती. आता अनन्या-आदित्य हे बॉलिवूडचे पुढचे क्युट कपल मानले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT