Salman Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: ऐश्वर्यापासून डेझीपर्यंत, सलमानची अधुरी प्रेमकहाणी…

बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमानच्या प्रेमाची चर्चा होणे ही काही पहिलीच वेळ नाही आणि त्याला प्रेमावरुन नेटकऱ्यांनी ट्रोल करणेही नवीन नाही.

Chetan Bodke

Salman Khan: बॉलिवूडमधील भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमानच्या प्रेमाच्या चर्चेला बरेच उधाण आले आहे. त्याच्या प्रेमाच्या चर्चा होणे ही काही पहिलीच वेळ नाही आणि त्याला प्रेमावरुन नेटकऱ्यांनी ट्रोल करणेही नवीन नाही. त्याचे बऱ्याचदा वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत नावे जोडली आहेत. त्यामुळे नक्की भाईजानचे कोणासोबत अफेयर हे सांगणे सध्या तरी कठीण आहे.

या निमित्ताने नेटकऱ्यांनी त्याच्या आधीच्या अफेअर्सची चर्चा नव्याने सुरु केली आहे. सलमानचे बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींसोबत नाव जोडले होते. काही दिवसांपूर्वी सलमानचे पूजा हेगडेसोबत जोडी जुळवली जात होती. दोघांनी अद्यापही रिलेशनवर भाष्य केले नाही. याआधीही सलमान नुसत्या एका अंगठीवरुन ट्रोल झाला होता.

सलमानने दुबईत साखरपुडा उरकल्याची चर्चाही बरीच रंगत होती. पण त्याचा साखरपुडा झाला नसून वडिलांनी दिलेली ती अंगठी होती. आज आपण सलमानचे कोणकोणत्या अभिनेत्रींसोबत नाव जोडले जात आहे, याची चर्चा करणार आहोत.

Salman

अभिनेत्री- मॉडेल शाहीन जाफरी ही सलमानची पहिली गर्लफ्रेंड होती. शाहीनला भेटण्यासाठी सलमान तिच्या कॉलेजखाली तासंतास ताटकळत उभा राहायचा. या दोघांच्याही अफेयरची जेव्हा चर्चा सुरु झाली तेव्हा सलमान अवघ्या १९ वर्षांचाच होता. शाहिन जाफरी कियारा अडवाणीची मावशी असल्याची चर्चा होत आहे.

सलमानचे दुसरे प्रेम म्हणजे मिस इंडिया संगीता बिजलानीसोबत.त्यांच्या लग्नाची पत्रिका छापून लग्न रद्द झाले होते. लग्न मोडल्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाल्याची ही चर्चा होत होती. ब्रेकअपनंतर संगिता आजही सलमानची चांगली मैत्रिण म्हणून ओळखली जाते.

Salman Khan

सलमानचे तिसरे प्रेम सोमी अली. सलमान- सोमी एकमेकांना जवळपास ८ वर्ष एकत्र डेट करत होते. जरीही सोमी सलमानसोबत प्रेमामध्ये सिरीयस असली तरी त्यांचा ब्रेकअप झाला होता. दोघांच्याही ब्रेकअपचे मुख्य कारण म्हणजे, सलमानचा रागीट स्वभाव.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील सलमान- ऐश्वर्याच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र होती. ऐन चित्रपटादरम्यानच त्यांचे सुत जुळल्याने चर्चेला अधिकच उधाण आले होते. १९९९ मध्ये सुरु झालेले प्रेम २००२ मध्ये यांचे नाते तुटले.

Salman- Katrina S

सलमानचे ऐश्वर्यानंतरचे सर्वाधिक चर्चेत असलेले प्रेम म्हणजे कतरिनासोबतचे. सलमान- कतरिना या दोघांना बऱ्याचदा मीडियाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. त्यांचे बरेच चित्रपट प्रेक्षकांना फार आवडले. त्यांचे २०१० मध्ये ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहे.

पडद्यावर ही हिट असलेली जोडी पडद्याआड सुद्धा हिट होणार का? असा सर्वांनाच प्रश्न होता. पण या प्रश्नाचे उत्तर नाहीच मिळाले. सलमानच्या प्रेमाची इच्छा वयाच्या साठीपर्यंत अपूर्णच राहिली असं बोलले तर वावगं ठरणार नाही.

Salman- Daisy Shah

'जय हो' चित्रपटात सलमानने डेझी शाहसोबत एकत्र काम केले होते. अनेकदा त्यांना पापाराझींनी कॅमेऱ्यात स्पॉट देखील केले होते. आतातरी सलमानला त्याचे खरं प्रेम मिळणार का?, का अजूनही त्याच्या प्रेमाची सोशल मीडियावर कायम चर्चाच होत राहणार? याचे उत्तर आपल्याला आगामी काळच देईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात खाकीला डाग, पोलिसाने महिलेची केली फसवणूक, ७३ तोळे सोन्यासह १७ लाख लुबाडले

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी, पगार २,७३,५०० ; लगेच करा अर्ज

Mumbai Crime: शरीरसंबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, ब्लॅकमेलिंक करत ३ कोटी उकळले; मुंबईत CAची आत्महत्या

Maharashtra Live News Update : गंगापूर धरणातून सध्या 6336 क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू

Methi Parathe Recipe: मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला, आता घरीच बनवा खुसखुशीत मेथीचे पराठे, १० मिनिटांत होईल रेसिपी तयार

SCROLL FOR NEXT