Welcome To The Jungle Saam Tv
मनोरंजन बातम्या

Welcome To The Jungle: 36 स्टार्स अन् भरपूर कॉमेडी; वेलकम टू द जंगल थिएटरमध्ये पास की फेल? वाचा प्रेक्षकांचे रिव्ह्यू

Welcome To The Jungle: अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'ला पहिल्याच दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. काहींनी कॉमेडीचं कौतुक केलं, तर काहींनी स्टोरीमुळे चित्रपटाला ट्रोल केलं आहे. वाचा संपूर्ण पब्लिक रिव्ह्यू.

Shruti Vilas Kadam

Welcome To The Jungle: अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित कॉमेडी चित्रपट 'वेलकम टू द जंगल' अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तब्बल ३६ कलाकारांची फौज, धमाल विनोद आणि मोठा स्टारकास्ट यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या असून, या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

'भूत बंगला'नंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा कॉमेडी अवतारात दिसत आहे. त्याच्यासोबत सुनील शेट्टी, रवीना टंडन आणि अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. रिलीजपूर्वी झालेल्या पेड प्रिव्ह्यू शोमधूनच चित्रपटाची चांगली चर्चा रंगली होती. आता थिएटरमध्ये चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली मते व्यक्त केली आहेत.

अनेक प्रेक्षकांनी चित्रपटातील निखळ विनोद आणि कलाकारांच्या टायमिंगचे भरभरून कौतुक केले आहे. एका प्रेक्षकाने लिहिले की, "ओरिजिनल कॉमेडीचा फील पुन्हा अनुभवायला मिळाला. अक्षय कुमार उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसतो. म्यूझिक, सिनेमॅटोग्राफी आणि क्लायमॅक्स जबरदस्त आहे. हा चित्रपट पूर्णपणे मनोरंजन करणारा आहे."

दुसऱ्या एका प्रेक्षकाने चित्रपट पाहण्यासाठी एक अटही सांगितली. त्याने लिहिले, "जर तुम्ही दमदार कथा किंवा वास्तववादी ॲक्शन शोधत असाल, तर हा चित्रपट तुमच्यासाठी नाही. पण डोकं बाजूला ठेवून फक्त हसायचं असेल, तर हा चित्रपट नक्की पाहा." अनेकांनी चित्रपटगृहात प्रवेश करण्यापूर्वी 'लॉजिक' बाहेर ठेवण्याचा सल्लाही दिला आहे.

एका युजरने म्हटले की, "इंटरव्हलपर्यंत एकामागून एक विनोद प्रेक्षकांना खळखळून हसवतात. फर्स्ट हाफ इतका मजेदार आहे की थिएटरमध्ये सतत हशा ऐकू येत होत्या." त्यामुळे हा चित्रपट कुटुंबासोबत पाहण्यास योग्य आहे.

दरम्यान, 'वेलकम टू द जंगल'ने रिलीजपूर्वीच्या पेड प्रिव्ह्यूमधून सुमारे ३.७५ कोटी रुपयांची नेट आणि ४.५० कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे. आता पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे सर्वांचे लक्ष लागले असून, हा मल्टिस्टारर चित्रपट प्रेक्षकांना आवडणार का नाही हे बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये नक्की कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free : शरीरात दिसतील 'हे' ६ चमत्कारिक बदल, फक्त ३० दिवस साखर खाणं करा बंद

Saturday Horoscope : डोकं शांत राहील, या राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा शनिवारचे राशीभविष्य

शरद पवार गटात मोठा फेरबदल होणार; महिला अध्यक्ष बदलणार, नावही ठरलं

Papaya Combination: पपईसोबत 'हे' ५ पदार्थ खाणे टाळाच, कॉम्बिनेशन ठरू शकते घातक

मच्छिमारांना मिळणार थेट 20-22 हजार रुपये; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT