Veena Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Veena Kapoor : पोटच्या मुलानंच केली अभिनेत्रीची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

अभिनेत्री वीणा कपूर यांच्या निधनानं अवघी टीव्ही इंडस्ट्री हादरली. पोटच्या मुलानंच वीणा कपूर यांची हत्या केली.

Chetan Bodke

Actress Veena Kapoor News: अभिनेत्री वीणा कपूर यांच्या निधनानं अवघी टीव्ही इंडस्ट्री हादरली. पोटच्या मुलानंच वीणा कपूर यांची हत्या केली. या घटनेनं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. मुलानं हे क्रूर कृत्य का केलं, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. या हत्येमागचं नेमकं कारण आता समोर आलं आहे.

'भाभी' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या वीणा कपूर यांच्या हत्येच्या घटनेनं टीव्ही इंडस्ट्रीतील प्रत्येक जण हादरला होता. त्यांची हत्या पोटच्या मुलानंच केल्याचं उघड झालं. त्यांचा मुलगा सचिननं बेसबॉलच्या बॅटनं त्यांची हत्या केली होती.

सचिननं जन्मदात्या आईचीच हत्या करून तिचा मृतदेह माथेरानजवळील नदीत फेकून दिला होता. संपत्तीच्या वादातून त्यानं ही हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.

काय आहे प्रकरण?

वीणा कपूर यांना दोन मुलं आहेत. त्यांचा एक मुलगा अमेरिकेत वास्तव्यास आहे. तो तिथं सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करतोय. तर वीणा मुंबईतील जुहूमध्ये आपला धाकटा मुलगा सचिनसोबत राहत होत्या. रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणाऱ्या मोठ्या मुलानं वीणा यांच्याशी संपर्क साधण्याचा बराच वेळ प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही. तर धाकट्या भावाकडून त्याला काही माहिती मिळत नव्हती. त्यावेळी त्यानं पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

प्रॉपर्टीसाठी मुलानंच केली हत्या

मीडिया रिपोर्ट्सनुसार ,सचिन कपूर याचे आपल्या आईशी प्रॉपर्टीवरून वाद सुरू होते. हे प्रकरण कोर्टातही पोहोचलं होतं. ज्या दिवशी वीणा यांची हत्या झाली, त्या दिवशी त्यांचं मुलाशी भांडण झालं होतं. त्यावेळी रागाच्या भरात सचिननं त्यांच्या डोक्यात बॅट मारली. त्यानंतर नोकराच्या मदतीनं त्यानं मृतदेह माथेरानमध्ये फेकलं. पोलिसांनी आरोपी मुलगा आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye Discharge: डोळ्यांच्या कोपऱ्यात चिपाड का जमा होते? कारणं आणि उपाय जाणून घ्या

Palghar Earthquake : पालघर भूकंपाने हादरलं! घाबरून नागरिक घराबाहेर धावले, अख्खी रात्र जागून काढली

Paneer Water Soup Recipe : पनीर बनवल्यावर उरलेलं पाणी फेकता? थांबा, १० मिनिटांत बनवा हेल्दी गरमागरम सूप

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पंचनामाचे आदेश

Blast Blast: भारताच्या शेजारील देशात पोलीस ठाण्यावर हल्ला, १३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT