twinkle khanna's wants hema malini as her mother  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Twinkle Khanna : हेमा मालिनी हवी होती माझी आई . ट्विंकल खन्ना असं का म्हणाली ?

Sneha Dhavale

ट्विंकल खन्नाला आपण अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांनी मुलगी खिलाडी अक्षय कुमारची पत्नी, आणि अभिनेत्री म्हणून ओळखतो. काही सिनेमांमध्ये आपण ट्विंकल खन्नाला अभिनय करताना पाहिलं आहे. पण ट्विंकल खन्नाची खरी प्रतिभा समोर आली ती लेखन कलेमधून. ट्विंकल खन्ना एक जबरदस्त लेखिका आहे. आसपास घडणाऱ्या घडामोडींवर ट्विंकल अगदी सहज सोप्या शैलीमध्ये आणि हो कमालीच्या विनोदी ढंगामध्ये भाष्य करते. ट्विंकल खन्नाने लिहिलेले अनेक लेख मासिक आणि वर्तमानपत्रामध्येही झळकली आहेत.

अनेक विषयांवर आपल्या बिनधास्त आणि तितक्याच मजेशीर शैलीत ट्विंकल खन्ना आपली मतं मांडते. अलीकडेच ट्विंकल खन्नानं एक प्रसिद्ध पेपरसाठी एक लेखन केलं आहे. या लेखात ट्विंकल खन्नानं रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबद्दल मत मांडली. त्याचबरोबर वॉटर प्युरिफायरपासून अनेक विषयांवर भाष्य केलं.

यावेळी तिनं मस्करी करताना तिनं एक इच्छा बोलून दाखवली आहे. हि इच्छा आहे आई विषयीची. तसं तर ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपडिया या ट्विंकल खन्नाच्या आई आहेत. पण बॉलिवू़डची ड्रिम गर्ल अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याविषयी ट्विंकल खन्नानं एक इच्छा व्यक्त केली आहे.

अभिनेत्री हेमा मालिनी या आपल्याला खऱ्या आई असत्या तर बरं झालं असतं. डिंपल कपडिया यांच्याऐवजी हेमा मालिनी आपल्या आई असत्या तर बात औरच असती असं, ट्विंकल खन्नानं म्हटलं आहे. याचं कारणही तितकंच मजेशीर आहे. आता विषय होता वॉटर प्युरिफायरच्या शुद्ध पाण्याचा ट्विंकल खन्नाचा सेन्स ऑफ ह्युमर इथंही दिसला. आता शुद्ध पाणी द्यायचं असेल तर हेमा मालिनी यांचा सर्वात जास्त पुढाकार असेल कारण हेमाजी गेल्या काही काळापासून एका वॉटर प्युरिफायर कंपनीच्या ब्रँड फेस आहेत.

हेमाजी वॉटर प्युरिफायर कंपनीच्या ब्रँड फेस आहेत. त्यामुळं हेमा मालिनी या आपल्या आई असत्या तर आजन्म आपल्या वॉटर प्युरिफायर शुद्ध पाणी अगदी फुकट मिळालं असतं, असं म्हणत ट्विंकल हसू लागली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Fire: खामगाव शहराजवळील श्रीहरी लॉन्सला भीषण आग; सर्वत्र पसरल्या आगीच्या ज्वाळा

Akshay Shinde: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? ७ तास चाललेल्या पोस्टमॉर्टममधून सत्य आलं बाहेर

Maharashtra News Live Updates: अक्षय शिंदेच्या चकमक प्रकरणी, कुटुंबियांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

Akshay Shinde Encounter: एन्काऊंटर की कायद्याच्या चिंधड्या? अक्षय शिंदे प्रकरणावरून विरोधकांची 'फायरिंग', मित्रपक्षाकडूनही महायुतीची कोंडी

Assembly Election: जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून आता भाजपमध्येच रस्सीखेच सुरू; माजी नगरसेविकेनंतर आता जिल्हाध्यक्षांना हवी उमेदवारी

SCROLL FOR NEXT