Blurr Trailer Saam TV
मनोरंजन बातम्या

Blurr Trailer: बहिणीच्या आत्महत्येचं गुढ उकलणार का तापसी? लवकरच 'ब्लर'मधून कथा उलगडणार, ट्रेलर प्रदर्शित

सध्या तापसीचा एक चित्रपट बराच चर्चेत आहे, तो म्हणजे 'ब्लर'. तापसीचा हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार नसून ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Blurr Trailer: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapasi Pannu) सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. तिच्या अभिनयाची चर्चा सर्वत्र आहे. सध्या तिचा एक चित्रपट बराच चर्चेत आहे, तो म्हणजे 'ब्लर' (Blurr). तिचा हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार नसून ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २०२० पासून भारतासह जगभरात लॉकडाऊन झाल्यापासून बरेच चित्रपट ओटीटीवरच प्रदर्शित करण्यात येत आहे. सिनेमांना चित्रपटगृहात मिळणारा प्रतिसाद पाहता निर्मात्यांनी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असलेला 'ब्लर'हा चित्रपट झी ५ (Zee 5) वर प्रदर्शित होणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरला चाहत्यांनी बराच प्रतिसाद दिला असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता कमालीची वाढली आहे. चित्रपटाचा ट्रेलर झी ५ (Zee 5) च्या इन्स्टाग्रामवरील अधिकृत पेजवर शेअर केला आहे. 'ब्लर'च्या ट्रेलरमध्ये, चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवते. गायत्री आणि गौतमी या दोघीही जुळ्या दाखवण्यात आल्या आहे.

गौतमी एका झाडाच्या फांदीला फास घेतलेल्या अवस्थेत दाखवण्यात आली आहे. तिने फाशी घेताना कोणतीही सुसाईड नोट दिलेली नाही. चित्रपटात तिच्या निधनाचे कारण आत्महत्या हेच दाखवले आहे. गायत्रीला आपल्या बहिणीने आत्महत्या केल्याचे कारण पटत नाही. त्यामुळे गायत्री आपल्या बहिणीच्या आत्महत्येचे गुढ उकलण्यासाठी शोध कार्य सुरु करते.

सोबतच गायत्रीच्या डोळ्यांची दृष्टी हळूहळू कमी- कमी होत जाते. बहिणीच्या मृत्यूचे कारण शोधण्यासोबतच गायत्री या आव्हानालाही सामोरे जाते. गुलशन देवैया गायत्रीच्या पतीच्या भूमिकेत आहे, जो तिला या वेडेपणापासून रोखू इच्छितो. दरम्यान काही घटना घडतात, ज्यामुळे चित्रपटातील सस्पेन्स वाढतो.

या चित्रपटाच्या माध्यमातून तापसी पन्नू निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. 'ब्लर'ची निर्मिती तापसीची प्रोडक्शन कंपनी आऊटसाइडर्स फिल्म्सने केली आहे. तापसीच्या या चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी जुलैमध्ये झाली होती. याचे शूटिंग नैनितालमध्ये अवघ्या 40 दिवसांमध्ये चित्रपटाचे शूटिंग झाले होते. 'ब्लर' हा स्पॅनिश चित्रपट ज्युलियाज आईजचा रिमेक आहे.

2022 मध्ये, तापसी पन्नू चे एकापेक्षा एक चित्रपट OTT वर बॅक टू बॅक प्रदर्शित होत आहेत. तापसीचा यावर्षीचा पहिला ओटीटी रिलीज चित्रपट 'लूपलापेटा' होता, जो जर्मन चित्रपट रन लोला रनचा रिमेक करण्यात आला होता. अशाप्रकारे 'ब्लर'सह यावर्षी OTT वर प्रदर्शित होणारा तापसीचा सहावा चित्रपट ठरणार आहे. 'ब्लर' (Blurr) 9 डिसेंबर रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mosquito Agarbatti: डास घालवण्यासाठी अगरबत्ती वापरताय? थांबा, ठरु शकते कुटुंबासाठी विषारी; वाचा रिपोर्ट

Maharashtra News Live Update: उष्णतेमुळे आंबा लवकर पिकू लागल्याने बाजारभावात मोठी घसरण

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींचा लाभ कायमचा बंद; ₹१५०० मिळणार नाही, सरकारने सांगितलं कारण

Sharad Pawar: शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ; भाजपमध्ये करणार एन्ट्री

Kandyachi Chutney Recipe : ना परतायची गरज ना भाजायची, फक्त ५ मिनिटांत 'अशी' बनवा कांद्याची झणझणीत चटणी

SCROLL FOR NEXT