मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (National Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सातारा येथे भर पावसात झालेली सभा प्रचंड गाजली होती. या सभेनंतर अनेक नेत्यांनी त्यांचा हा पॅटर्न फॉलो केला आणि सभा गाजवल्या. पुन्हा एकदा हा पॅटर्न पाहायला मिळाला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या म्हैसूर सभेच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. राहुल गांधी यांनी पाऊस चालू असताना देखील भाषण सुद्धा सुरूच ठेवले. महागाई, बेरोजगारी तसंच जीएसटीमुळे देशात निर्माण झालेली आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकारणाच्या केंद्रीकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या तीव्र झालेल्या प्रश्नांकडे दिल्लीतील सत्ताधीशांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
कर्नाटकातील (Karnatak) म्हैसूर येथे झालेल्या भारत जोडो यात्रेला राहुल गांधी यांनी भरपावसात सभेला संबोधित केले.आम्ही बेरोजगारी आणि रोजगाराचा मुद्दा मांडत राहू, असे राहुल गांधी म्हणाले. या सभेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ वायरल झाले आहेत. राहुल गांधींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री स्वर भास्कर (Bollywood Actress Swara Bhaskar) हिने देखील एक खास ट्विट केल आहे.
स्वराने राहुल गांधी यांचा पावसातील सभेचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करता तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, अप्रतिम फोटो, फोटोग्राफर कोण आहे? त्यापुढे ती म्हणते की, "सदियों रहा है दुश्मन दौर ए जमां हमारा,कुछ बात है की हस्ती मिटती नहीं हमारी. क्षण! तुमच्या या निश्चयाला आणखी बळ मिळो! राहुल गांधी भारत जोडो"
स्वराच्या या ट्विटची बरीच चर्चा होत आहे. परंतु स्वराने याआधीही राहुल गांधींना पाठिंबा देण्यासाठी ट्विट केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.