Aarya 3 Release Date Instagram
मनोरंजन बातम्या

Aarya 3 Release Date: सावधान! वाघीण येतेय...; ‘आर्या ३’ची प्रदर्शनाची तारीख रिलीज

Aarya 3 Latest News: सुष्मिता सेनच्या ‘आर्या ३’ वेबसीरीजच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

Chetan Bodke

Aarya 3 Release Date Declared

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या ‘ताली’ वेबसीरीजमुळे प्रचंड चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुष्मिता प्रमुख भूमिकेत राहिलेली ही वेब सीरीज ‘जियो सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. आता सध्या अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आली. सुष्मिताची आगामी महिन्यात ‘आर्या ३’ ही वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही गुड न्युज दिली असून वेबसीरीजचा मोशन पोस्टरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘आर्या’ आणि ‘आर्या २’च्या भरघोस यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला ही ‘आर्या ३’ ही वेबसीरीज येणार आहे. ज्यावेळी निर्मात्यांनी या वेबसीरीजची घोषणा केली, तेव्हापासूनच चाहत्यांना या वेबसीरिजबद्दल उत्सुकता आहे. अभिनेत्रीने नुकताच सोशल मीडियावर वेबसीरीजचा मोशन पोस्टर शेअर केला आहे.

मोशन पोस्टरच्या सुरुवातीला वाघाने मारलेले नखं दिसून येत आहेत. आणि पुढे वेबसीरीजच्या प्रदर्शनाची तारीख दिसत आहे. दरम्यान, ही वेबसीरीज येत्या ३ नोव्हेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. वेबसीरीजचा मोशन पोस्टर शेअर करताना कॅप्शन दिले की, “वाघीण परत येण्याची वेळ जवळ आलीय.” अशा आशयाचं कॅप्शन शेअर केलं आहे.

‘आर्या ३’ वेबसीरीजमध्ये कोण कोण असणार? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत सुष्मिता सेनसोबत अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेर सोबत अनेक नव्या चेहऱ्यांना वेबसीरीजमध्ये संधी देण्यात आली. गेल्या काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी टीझर शेअर केला होता. त्या टीझरमध्ये अभिनेत्रीचा नवा लूक प्रेक्षकांना दिसला होता. त्यासोबतच तिच्या आयुष्यात आलेल्या काही बदलांमुळे तिचे आयुष्य कसे बदलते हे दाखवले. टीझरच्या, मोशन पोस्टरच्या कमेंट बॉक्समध्ये अभिनेत्रीच्या चाहत्यांकडून तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील आज बीड दौऱ्यावर

Pune Water Cut : पुण्यात पाणीकपातीचं संकट! कोणत्या दिवशी कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?

Mrunmayee Deshpande : मनवा अन् श्लोकची जबरदस्त केमिस्ट्री; मृण्मयी देशपांडेच्या 'मना'चे श्लोक' चित्रपटाचे पहिलं गाणं रिलीज, पाहा VIDEO

Navratri 2025 : यंदा नवरात्र १० दिवसांची, देवीचे आगमन हत्तीवर; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Betting App Case: युवराज सिंहला ED ची नोटीस; 23 सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT