Jatadhara First Look SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jatadhara First Look: विखुरलेले केस अन् कपाळावर कुंकू; साऊथच्या सिनेमात झळकणार बॉलिवूडची अभिनेत्री, फर्स्ट लूक आला समोर

Sonakshi Sinha : साऊथ चित्रपट 'जटाधरा'चे पहिले पोस्टर समोर आले आहे. पोस्टरमधील अभिनेत्रीच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Shreya Maskar

दिग्दर्शक व्यंकट कल्याण याचा धमाकेदार चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव 'जटाधरा' (Jatadhara)असे आहे. चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत बॉलिवूडची 'दबंग गर्ल' पाहायला मिळत आहे. तिचा पोस्टमधील लूक पाहून तिला ओळखणे चाहत्यांना कठीण होत आहे.

'जटाधरा' चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी (Sonakshi Sinha) सिन्हा झळकणार आहे. तिच्या लूकचे पहिले पोस्टर समोर आले आहे. 'जटाधरा' चित्रपटातून सोनाक्षी सिन्हा तेलुगू सिनेमातून साऊथ सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. काल (8 मार्च) महिला दिनानिमित्त सोनाक्षीने हे चाहत्यांना गिफ्ट दिले आहे. 'जटाधरा'च्या पहिले पोस्टरला खूप हटके कॅप्शन देण्यात आले आहे. "शक्ती आणि सामर्थ्याची ताकद" असे खास कॅप्शन देण्यात आले आहे.

सोनाक्षीचा लूक

पोस्टरमध्ये सोनाक्षी सिन्हाचा रुद्रावतार पाहायला मिळत आहे. असा सोनाक्षीचा लूक कधीच कोणी पाहिला नसेल. विखुरलेले केस, कपाळावर कुंकू , काळेशार डोळे आणि त्यात आग दिसत आहेत.सोनाक्षीने एखाद्या राणी सारखे हातात, गळ्यात आणि डोक्यावर दागिने परिधान केले आहे. तसेच तिची हाताची लांबलचक नखे पोस्टरचे लक्ष वेधून घेत आहेत.

'जटाधरा'च्या पहिल्या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्स, कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच सोनाक्षीचा हा लूक पाहून चाहत्यांची चित्रपटासाठी खूप उत्सुकता वाढली आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. 'जटाधरा' चित्रपटात सोनाक्षीसह बिग बॉस फेम अभिनेत्री शिल्पा शिरोडकर देखील पाहायला मिळणार आहे.'जटाधरा' चित्रपट सस्पेंस थ्रिलर आहे. सुधीर बाबू (Sudheer Babu) चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Mama : 'बिग बॉस मराठी' सुरू होण्याआधीच अशोक मामांची एक्झिट; मालिकेचा शेवट कसा होणार? पाहा VIDEO

Hair Care : लांब आणि जाड केसांसाठी जादुई नुस्खा, फक्त वापरा या घरगुती गोष्टी

Jaipur Accident: हायवेवर रात्री भयानक अपघात! भरधाव कारने १६ जणांना उडवले, अन्...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी? एरियर किती मिळणार? वाचा कॅल्क्युलेक्शन

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

SCROLL FOR NEXT