Shriya Saran Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shriya Saran: श्रीयाला पतीचे चुंबन घेणं आवडतं; म्हणते, 'हे तर नॉर्मल…'

यापूर्वी सुद्धा श्रीया आणि तिच्या पतीने दोघांनीही कॅमेऱ्यासमोर चुंबन केले होते. त्यावेळी सुद्धा हे दोघे बरेच ट्रोल झाले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shriya Saaran: सध्या अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला 'दृश्यम 2' चित्रपटाची सर्वत्र यशस्वी घोडदौड कायम आहे. चित्रपटाने आतापर्यंत 100 कोटींच्या आसपास गल्ला जमवला आहे. सध्या अजय सोबत प्रत्येक कलाकाराची चांगलीच चर्चा होत आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकार सध्या भलतेच चर्चेत दिसून येत आहे. त्यातच एक अभिनेत्री बरीच ट्रोल झाली आहे. तिने ट्रोल होण्यासारखे कृत्ये केल्याने चर्चेत आली आहे.

श्रीया आणि तिचा पती विमानतळावर लीपलॉक करताना कॅमेऱ्यात कैद झाली होती. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडिया पेजवरुन शेअर करण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये श्रीया सरन आणि पती आंद्रेई कोस्विच कॅमेऱ्यासमोर पोझ देत कीस करताना दिसले. यापूर्वी सुद्धा या दोघांनीही कॅमेऱ्यासमोर असे कृत्ये केले होते. त्यावेळी सुद्धा हे दोघे बरेच ट्रोल झाले होते.

त्या दोघांनाही व्हिडिओवर कमेंटच्या माध्यमातून ट्रोलर्सने म्हणतात, 'समाजाला माहित आहे की, तुम्ही पती- पत्नी आहेत', 'जिथे सर्वाधिक नागरिकांचा वावर असतो तिथे हे कृत्ये करणे तुम्हाला शोभतंय का?','घरातील जागा कमी पडली म्हणुन पापाराझींच्या समोर आली का?','कॅमेऱ्यासमोर हे कृत्ये करायला कसे काय जमतं?' अशा कमेंटने ट्रोल करण्यात आले.

श्रियाला तिच्या पतीने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किस केल्यावर वारंवार होणाऱ्या ट्रोलिंगचा सामना करण्याबद्दल विचारण्यात आलं. श्रिया मीडियासोबत संवाद साधताना म्हणाली, “माझ्या खास क्षणी मला माझ्या पतीला किस करणं नॉर्मल वाटतं आणि ते सुंदर आहे, असं मला वाटतं. अशा नॅचरल गोष्टींवरून का ट्रोल केलं जातं हेच आंद्रेईला कळत नाही” असं तिने सांगितलं.

ट्रोलिंगला कशाप्रकारे सामोरी जातेस याबद्दल विचारलं असता श्रिया म्हणते, “मी वाईट कमेंट्स वाचत नाही आणि त्यांच्यावर प्रतिक्रिया देत नाही. वाईट कमेंट्स लिहिणं हे नेटकऱ्यांचे काम आहे आणि माझं काम त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आहे. त्यामुळे मी फक्त मला जे करायचे आहे तेच करते.”

सध्या श्रीया 'दृश्यम २' चित्रपटाची टीम यशाचा आनंद लूटत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 'दृश्यम २' ने आतापर्यंत १०० कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs WI: 347 दिवसांनंतर 'या' गेमचेंजर खेळाडूची अखेर टीममध्ये एन्ट्री; पाहा वेस्ट इंडिजविरूद्ध कशी आहे प्लेईंग 11

Satara Tourism : साताऱ्याला गेल्यावर करा ट्रेकिंगचा प्लान, दिवसभर होईल धमाल-मस्ती

Jio Recharge Plan: सप्टेंबर २०२६ पर्यंत रिचार्जची चिंता मिटली! एकदाच रिचार्ज करा, संपूर्ण वर्षभर मोबाईल वापरा

Alia Bhatt : फोटोसाठी आलियाला ओढलं, हाताला झटका दिला; संतापजनक VIDEO समोर

Amravati Election : अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीला सुरुवात, २०२० मधील 'व्होट चोरी'चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

SCROLL FOR NEXT