Shradhha Kapoor Unfollows Boyfriend Rahul Mody Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shradhha Kapoor And Rahul Mody : श्रद्धा कपूरचं राहूल मोदीसोबत ब्रेकअप? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Shradhha Kapoor Unfollows Boyfriend Rahul Mody : एकीकडे श्रद्धा कपूर स्त्री 2 चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, तर दुसरीकडे श्रद्धाच्या ब्रेकअपची अफवा पसरत आहे. याचं कारणही तसंच आहे.

Apurva Kulkarni

श्रद्धा कपूरचा लवकरच 'स्त्री २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या श्रद्धा कपूर व्यस्त आहे. त्यात आता श्रद्धाच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगत आहेत. एकीकडे श्रद्धा कपूरने अजून राहूल मोदी याच्या रिलेशनशिपबाबत जाहीर केलेले नसताना दुसरीकडे त्यांच्या ब्रेकअपबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूरने राहूल मोदीसोबत ब्रेकअप केला असल्याचे बोलले जात आहे. तसंच श्रद्धाने राहूलला इंस्टाग्रामवर अनफॉलोही केल्याचे बोलले जात आहे. श्रद्धाने केवळ राहूलच नाही तर त्याच्या बहिणीला आणि राहूलच्या प्रोडक्शन हाऊसलाही अनफॉलो केलेलं आहे. त्याच बरोबर राहूल मोदीने त्याच्या पेट अकाउंटवरूनही श्रद्धाला अनफॉलो केले आहे. त्यामुळे चाहत्यांना दोघांचाही खरंच ब्रेकअप झाला आहे का? याबाबत प्रश्न पडला आहे.

सोशल मीडियावर श्रद्धा नेहमीच ॲक्टिव्ह असते. नेहमी घरातले, तसंच सणासुदीच्या दिवसाचे फोटो, व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.त्यामुळे चाहत्यांच्या ती अगदीच जवळ असते. त्यात तिने आता राहूल मोदी आणि त्याच्या बहिणीसह प्रोडक्शन हाऊसला अनफॉलो केल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

श्रद्धाने इशाऱ्याने केलेले प्रेम व्यक्त

काही महिन्यापूर्वी श्रद्धा कपूरने इन्टाग्रामवर फोटो पोस्ट करत इशाऱ्याने प्रेमाची कबूली दिली होती. पोस्टमध्ये श्रद्धा फोटोमध्ये बेडवर झोपली होती, आणि तिच्या गळ्यात 'R' नावाचं पेंडेंट दिसून येत होते. तसंच तिने राहूल मोदीसोबत सेल्फी पोस्ट करत 'दिल रख' ले नींद तो वापस कर दे यार।' असं कॅप्शन दिले होते.

राहूल मोदीसोबत चित्रपटात काम करणार होती श्रद्धा कपूर

श्रद्धाच्या एका चित्रपटासाठी राहूलसोबत चर्चा सुरू असल्याचं बोलले जात होते. ज्यामध्ये राहूल स्वत: चित्रपट प्रोड्युस करणार होते.

अनंत आणि राधिकाच्या कार्यक्रमात दोघे होते एकत्र

मार्चमध्ये श्रद्धा आणि राहूल अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमात एकत्र दिसले होते. तसंच जामनगरच्या एयरपोर्टरही दोघे एकत्र जाताना कॅमेऱ्यात आले होते.

एकीकडे श्रद्धाने अजूनही त्याच्या नात्याबाबत चाहत्यांना जाहीर केले नसताना दुसरीकडे त्याच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर श्रद्धा-राहूलच्या ब्रेकअपचा पाऊस पडत असलेला पहायला मिळत आहे. परंतु नक्की काय हे याबाबत चाहत्यांच्या मनात सभ्रम निर्माण झालेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

SCROLL FOR NEXT