Siddhi Hande
बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे श्रद्धा कपूर.
श्रद्धा कपूर लवकरच 'स्त्री २' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी श्रद्धाने खास लूक केला आहे.
श्रद्धाने या कार्यक्रमाला लाल रंगाची सुंदर साडी नेसून त्यावर वेणी घातली होती.
ट्रेलर लाँचवेळी श्रद्धाला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता.
यावर श्रद्धाने हटके स्टाईलने उत्तर दिले आहे. 'ती स्त्री आहे, तिला जेव्हा नवरी बनायचे असेल तेव्हा ती बनेन', असं तिने सांगितले.
श्रद्धा गेल्या अनेक दिवसांपासून राहुल मोदीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यातच आता तिने दिलेल्या या उत्तराने चर्चांना अजूनच उधाण आले आहे.
श्रद्धा कपूरचा जन्म ३ मार्च १९८७ रोजी झाला. श्रद्धा कपूर प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर यांची लेक आहे.