Siddhi Hande
मराठी चित्रपटसृष्टीतील गिरीजा ओक ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीसह तिने हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. जवान चित्रपटात तिने शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर केली आहे.
गिरीजा ओकने नुकतीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती.
गिरीजाने या सोहळ्यासाठी खास मराठमोळा लूक केला होता.
गिरीजा ओकने या सोहळ्यासाठी खास जांभळ्या रंगाची पैठणी नेसली होती.
गिरीजाने पैठणी साडीवर तिने फुल स्लिव्हसचा ब्लाऊज, त्यावर डायमंडचा हार घातला होता.
गिरीजाने या साडीवर केसात गजरा माळून पारंपारिक साजश्रृंगार केला आहे.
गिरीजा या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. गिरिजाचे सौंदर्य या साडीत अजूनच खुललं आहे.