Shraddha Kapoor Reaction On Shubman Gill Wicket Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shubman Gill Wicket Controversy: शुभमनच्या विकेटवर बॉलिवूड अभिनेत्री भडकली, एका शब्दातच अंपायरला सुनावले खडेबोल..

Shraddha Kapoor Reaction On Shubman Gill Wicket: भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यातील शुभमन गिलची विकेट खूप वादग्रस्त ठरली होती. यावरील बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरची मजेशीर कमेंट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Shraddha Kapoor Reaction: बॉलिवूडचं क्रिकेटचं नातं खूपच खोलवर आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना क्रिकेट पाहायला फारच आवडते. अनेक आयपीएल टीमचे मालक देखील अनेक सेलिब्रिटी आहेत. नुकतंच भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा सामना झाला..

ऑस्ट्रेलियन संघाने हा सामना अगदी सहज जिंकत विजेतेपदावर आपले नाव कोरले. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर जरी हा सामना मैदानात पाहू शकली नसली, तरी तिने आपल्या घरी हा सामना पाहिला. टेस्ट मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शुभमन गिलच्या विकेटवरुन मोठा वाद झाला होता. शुभमन नॉट आऊट होता, असं सर्वच क्रिकेटप्रेमींच मत आहे. शुभमनला बाद देण्याचा निर्णय श्रद्धाला पटलेला नाही.

भारत- ऑस्ट्रलिया सामन्यात कॅमेरून ग्रीनने शुभमन गिलची कॅच पकडली आहे. पण रिप्लेमध्ये ग्रीन कॅच पकडत असताना बॉल मैदानाला टच होताना दिसून येत आहे. त्यावरून सर्वत्रच वाद झाला. आणि अंपायरने दिलेल्या निर्णयालाही नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. खुद्द शुभमन गिलही या निर्णयाने खूप दुःखी झालेला दिसला. आता सामन्याचा आनंद लुटणाऱ्या श्रद्धा कपूरलाही हे पचवता आले नाही. तिने अंपायरच्या निर्णयावर अतिशय मजेशीर आणि गंमतीशीर पद्धतीने टोमणा मारला.

Shraddha Kapoor Reaction

अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर बदामाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती हसताना आणि हातात बदाम दाखवत दिसत आहे. तिने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तिसऱ्या अंपायरला मी बदाम ऑफर करते’. भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात शुभमन गिलची विकेट खूपच महत्वाची होती. या विकेटमुळे टीम इंडिया बॅकफूटवर गेलीय.

श्रद्धाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, श्रद्धा कपूर सध्या गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘तू झुठी में मक्कर’ला मिळालेलं सक्सेस सेलिब्रेट करते. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसली होती. दोघांच्या जोडीला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT