Shilpa Shetty First Look In Kannada films KD  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty First Look: कन्नड चित्रपटामध्ये शिल्पाचा दमदार कमबॅक; रेट्रो लूकमधील पहिली झलक दिसतेय कडक

Kannada films: शिल्पा शेट्टी 'किंगडम' या चित्रपटातून कन्नड चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Pooja Dange

Shilpa Shetty Returns to Kannada films: कर्नाटकात जन्माला आलेल्या शिल्पा शेट्टी कुंद्राने सँडलवूडमधील मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर शिल्पाने कन्नडमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर प्रभुदेवाच्या 'मिस्टर रोमियो' (1996) या तमिळ सिनेमात काम केले. आता 18 वर्षांनंतर, शिल्पा ध्रुव सर्जाच्या आगामी 'केडी' उर्फ 'किंगडम' या चित्रपटातून कन्नड चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, द्रुवा सर्जाचा महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘केडी-द डेव्हिल’ च्या निर्मात्यांनी याची घोषणा केली आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आहे. या चित्रपटामध्ये शिल्पा चित्रपटात सत्यवतीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये शिल्पाचा नवीन अवतार पाहायला मिळणार आहे, शिल्पाचा लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता खूप वाढली आहे.

1970 च्या दशकात बंगळुरूमध्ये घडलेल्या वास्तविक घटनांवर हा अॅक्शन एंटरटेनर चित्रपट आधारित आहे. द्रुवा सर्जासह या चित्रपटात व्ही रविचंद्रन, संजय दत्त आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा देखील एका रणांगणात उतरणार आहेत.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम तिचा या चित्रपटातील फर्स्ट लूक पोस्ट केला आहे. तसेच तिने लिहिले आहे, उगादीच्या हार्दिक शुभेच्छा! गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! या शुभ दिवशी नवीन सुरुवात जर्त आहे , #KD च्या रणांगणात युद्धात प्रवेश करणारे एक नवीन पात्र #𝐒𝐚𝐭𝐲𝐚𝐯𝐚𝐭𝐢 म्हणून शेअर करताना मला आनंद होत आहे!'

शिल्पाच्या या पोस्टवर नेटकरी तसेच सेलिब्रिटी शिल्पाचे कौतुक आणि अभिनंदन करत आहेत.

शिल्पा या चित्रपटाविषयी भावना व्यक्त करताना म्हणाली, “राज्यांमध्ये युद्ध लढले जाते आणि प्रत्येक राज्याला ‘सत्यवती’ हवी असते. 'KD' रणांगणात सामील होण्यासाठी आणि या शक्तिशाली भूमिकेत पाऊल ठेवण्यासाठी मी खूप उत्साहित आहे.”

केव्हीएन प्रॉडक्शन प्रस्तुत ‘केडी-द डेव्हिल’, ज्याचे दिग्दर्शन प्रेम यांनी केले आहे. हा चित्रपट तामिळ, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

SCROLL FOR NEXT