Shehnaaz- MC Square New Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shehnaaz- MC Square: शहनाज- एमसी स्क्वेअर एकाच फ्रेममध्ये, पोस्टरपाहून चाहते उत्सुक

शहनाजने नुकतेच सोशल मीडियावर हसल 2.0 विजेता एमसी स्क्वेअरसोबत नवीन गाण्याची घोषणा केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shehnaaz- MC Square: बिग बॉस फेम शहनाज गिल तिच्या चाहत्यांसाठी लवकरच मोठी बातमी शेअर करणार आहे. तिने नुकतेच सोशल मीडियावर हसल 2.0 विजेता एमसी स्क्वेअरसोबत नवीन गाण्याची घोषणा केली होती. नुकतेच या गाण्याचे शीर्षक आणि पोस्टर रिलीज करण्यात आले असून संगीतप्रेमींसाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी ही खास भेट म्हणावी लागेल.

एमसी स्क्वेअरसोबत रोमँटिक केमिस्ट्री शेअर करणारी शहनाज गिल या पोस्टरमध्ये फारच सुंदर दिसत आहे. एमसी स्क्वेअर- शहनाज गिलच्या या गाण्याचे शीर्षक 'गनी सयानी' असे ठेवण्यात आले असून हे गाणे ५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. गाण्याचे पोस्टर पाहिल्यानंतर तिच्या लूकबद्दल आणि गाण्याबद्दल चाहते फारच उत्सुक आहेत.

या पोस्टरमध्ये गाण्याचे शूटिंग वाळवंटात झाल्याचे दिसत आहे. शहनाज गिलचा लूकने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या लूकमध्ये शहनाज सोनेरी रंगाचे कपडे घालून तिचे सौंदर्य खुलवताना दिसत आहे. साइड स्लिट गोल्डन गाऊनमध्ये शहनाज फार सुंदर दिसत आहे, तर एमसी स्क्वेअर देखील बरीच डॅशिंग दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहनाज गिल- एमसी स्क्वेअरमध्ये एकत्र काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत. सोशल मीडियावर हे दोघेही त्यांच्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत होते. अलीकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये शहनाज एमसी स्क्वेअरसोबत सिद्धार्थ शुक्लाचे गाणे गात आहे.

व्हिडिओ पाहून शहनाज आणि एमसी स्टॅंडचे चाहते त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. शहनाजने गाण्याची घोषणा केल्यापासून आणि आता पोस्टर केल्यापासून चाहते नव्या गाण्यासाठी फारच उत्सुक दिसत आहेत. तिच्या गाण्याच्या पोस्टरवर अवघ्या काही वेळातच दहा हजाराहून अधिक युजर्सने पोस्टला लाईक आणि शेअर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

Parenting Tips: पालकांनी मुलांना दररोज 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजे?

Heart Attack : सोमवारीच का होतो हार्टवर अटॅक, संशोधनातून नेमकं काय समोर आलं? VIDEO

Dharashiv : ST प्रवाशांचा जीव धोक्यात; महामंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडूनच विभागाचा कारभार उघड

SCROLL FOR NEXT