Sara Ali Khan Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान Sara Ali Khan जखमी, VIDEO शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं?

Sara Ali Khan Injured: सारा अली खान सध्या 'ए वतन मेरे वतन' (Ae Watan Mere Watan Movie) आणि 'मर्डर मुबारक'च्या (Murder Mubarak Movie) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सारासोबत तिच्या दोन्ही चित्रपटांच्या प्रमोशनदरम्यान एक दुःखद घटना घडली.

Priya More

Sara Ali Khan Viral Video:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या चर्चेत आली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सारा अली खान जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे. साराचे पोट भाजले आहे. अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली. साराचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

सारा अली खान सध्या 'ए वतन मेरे वतन' (Ae Watan Mere Watan Movie) आणि 'मर्डर मुबारक'च्या (Murder Mubarak Movie) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सारासोबत तिच्या दोन्ही चित्रपटांच्या प्रमोशनदरम्यान एक दुःखद घटना घडली. साराचे पोट भाजले. असे असूनही तिने चित्रपटाचे प्रमोशन करणे थांबवले नाही. पोट भाजले असताना देखील साराने ही गोष्ट फार गंभीरपणे घेतली नाही.

सारा अली खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पोट भाजल्याची घटना कवितेच्या शैलीत सांगत आहे. ती मेकअप रूममध्ये असल्याचे दिसत आहे. त्याचसोबत तिच्या पोटाच्या भाजलेल्या भागावर औषध देखील लावल्याचे दिसत आहे. साराने व्हिडीओ शेअर करत मजेशीर पद्धतीने नेमकं काय घडलं ते सांगितले. पण हे ऐकल्यानंतर तिची असिस्टंट रागावली.

व्हिडिओमध्ये सारा म्हणतेय, 'जेव्हा तुम्ही दोन चित्रपटांचे प्रमोशन करत असता तेव्हा असा गोंधळ होतो. अब क्या करे, जल गया मेरा पेट, हो गई मैं लेट और सबको करना पड़ा वेट।' साराने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी धडा शिकला आहे. आपण एवढेच म्हणू शकतो की नशीब खराब होते.'

साराच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून अनेक कमेंट येत आहेत. साराची अंटी सबा पतौडी यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले, 'झरना एक स्टार आहे. आशा आहे की जास्त भाजले नसावे. स्वतःची काळजी घे. तू लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करते. त्याचसोबत तुला चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 'मर्डर मुबारक' पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे.'

सारा अली खानचा 'ए वतन मेरे वतन' 1942 च्या भारत छोडो आंदोलनावर आधारित आहे. ज्यामध्ये सारा उषा नावाच्या स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारत आहे. जी ब्रिटिशांशी लढताना गुप्तपणे रेडिओ वाजवला होता. हा चित्रपट 21 मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेमध्ये हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. त्याचवेळी, साराचा दुसरा चित्रपट 'मर्डर मुबारक' 15 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. यात पंकज त्रिपाठी, विजय वर्मा, करिश्मा कपूर, डिंपल कपाडिया, टिस्का चोप्रा आणि संजय कपूर हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Vipreet Rajyog 2025: 28 नोव्हेंबर रोजी मीन राशीत मार्गी होणार शनी; विपरीत राजयोगामुळे मिळणार पैसाच पैसा

Local Body Election : राज्यात मोठी राजकीय उलथापालथ? २८८ पालिका-पंचायतींसाठी स्थानिक नेतेच ठरवणार उमेदवार

Ladki Bahin Yojana KYC: उरला फक्त आठवडा! लाडक्या बहिणींनो आजच eKYC करा, अन्यथा ₹१५०० विसरा

Maharashtra Weather Update : पुणे महाबळेश्वरपेक्षा थंड, धुळ्यात पारा ८.६ अंशावर; राज्यात थंडीची जोरदार एंट्री

SCROLL FOR NEXT