Hrithik Roshan and Saba Azad Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan: हृतिक रोशनला गर्लफ्रेंडकडून अनोख्या शुभेच्छा, म्हणाली 'तू माझ्यासाठी जन्म घेतला...'

ह्रतिकला त्याच्या वाढदिवशी अनेकजण शुभेच्छा देत आहेत. त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हिने सुद्धा हृतिकला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Chetan Bodke

Hrithik Roshan: बॉलिवूडचा हँडसम हंक अशी हृतिक रोशनची ओळख आहे. हृतिकचा आज ४९वा वाढदिवस आहे. याच महिन्यात २०००साली हृतिकचा पहिला चित्रपट 'काहो ना प्यार है' प्रदर्शित झाला होता. हृतिकच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते आनंदी आहेत. तसेच अजून व्यक्ती त्याच्या जन्माने आनंदी आहे. सोशल मीडियावर तिने हृतिकसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

ह्रतिकला त्याच्या वाढदिवशी अनेकजण शुभेच्छा देत आहेत. त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हिने सुद्धा हृतिकला खास शुभेच्छा दिल्या आहेत. सबाने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट आणि व्हिडिओ करत हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सबाने हृतिकचे आणि तिचे एकत्र फोटो शेअर केले आहेत.

त्यातील एका फोटोमध्ये तो त्याच्या कुत्र्याशी खेळताना दिसत आहे. तर एका फोटोमध्ये चोरून केक बघत आहे. फिटनेस फ्रिक हृतिक असे का करत असेल हे तुमच्या लक्षात आलेच असेल. तर सबाने शेअर केलेल्या पहिल्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये हृतिक सतरंजीवर डोळे मिटून शांतपणे पडला आहे. हृतिकचा हा फोटो खूपच बोलका आहे.

सबाने हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत हृतिकसाठी एक खास मेसेज देखील लिहिला आहे. 'हा 'रो'चा दिवस आहे !! हे रो!! तू ज्या सर्कसमधून पुढे सरकत आहेस, त्याला आम्ही जीवन म्हणतो, नेहमी मोठे डोळे करून आणि जिज्ञासूपणे गोष्टी पाहणे, सतत कुठेतरी गुंतून राहणे, स्ट्रँग हृदय, तीक्ष्ण मेंदू, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शिकणारा विद्यार्थी, त्रासदायक पण हट्टी.

दररोज चांगले बनण्यासाठी, प्रेमाने परिपूर्ण आयुष्य जगणार तू. जग उपकार परत करत नाही हे माहित असूनही या "नियमाला अपवाद" ठरणार तू. तू सर्व स्टिरियोटाइपला झुगारून देतास आणि सर्वांना गोंधळात टाकतो, लोक क्वचितच आश्चर्यचकित होतात परंतु तू, दररोज, अनेक मार्गांनी सर्वांना चकित करणे सुरू ठेवले आहेस.

जग खूप विचित्र आहे पण तू त्या जगात राहून ते अधिक चांगले बनवत आहेस. प्रतिभावान व्यक्ती, सर्वात विचित्र बनून राहा. जन्म घेतल्याबद्दल धन्यवाद', असा मेसेज सबाने हृतिकसाठी लिहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT