Rambha Car Accident Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rambha Car Accident : बॉलीवूड अभिनेत्रीच्या कारला भीषण अपघात; मुलांना शाळेतून आणताना घडली घटना

या अपघातात अभिनेत्रीच्या कारचा चक्काचूर झाला आहे.

Shivani Tichkule

Rambha Car Accident: बॉलिवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री (Actress) रंभा हिच्याबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. रंभाच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात (Accident) रंभाच्या कारचा चक्काचूर झाला आहे. कारमध्ये अभिनेत्रीची मुले आणि त्यांचा सांभाळ करणारी आयाही कारमध्ये उपस्थित होती. या अपघातात रंभाच्या मुलीला दुखापत झाली असून तिला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.

अपघात कसा झाला?

रंभाने कार अपघाताची धक्कादायक बातमी तिच्या सोशल मीडियावरद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने कारचे फोटोही शेअर केले आहेत. या अपघातात रंभाच्या कारचे मोठे नुकसान झाल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. मात्र, तिला फारशी दुखापत झालेली नाही.

अपघाताची दु:खद बातमी चाहत्यांशी शेअर करताना रंभाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले - मुलांना शाळेतून घरी घेऊन जात असताना आमची कार दुसऱ्या कारला धडकली. यावेळी माझ्यासोबत लहान मुले आणि त्यांची आया गाडीत होते. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. आम्हाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. पण माझी मुलगी साशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रंभाची मुलगी रुग्णालयात

कारचे फोटो शेअर करण्यासोबतच रंभाने हॉस्पिटलच्या खोलीतील तिच्या मुलीचा फोटोही शेअर केला आहे. रंभाची मुलगी रुग्णालयाच्या बेडवर दिसत आहे. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. रंभाने चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. 

रंभाच्या पोस्टवर कमेंट करून, सेलिब्रिटी आणि चाहते तिच्या प्रकृतीची विचारणा करत आहे. त्याचबरोबर अनेक लोक रंभाला या कठीण काळात खंबीर राहण्याचा सल्लाही देत ​​आहेत. रंभाच्या अपघाताच्या बातमीने चाहते अस्वस्थ झाले आहेत. 

कोण आहे रंभा?

रंभा सध्या फिल्मी दुनियेपासून दूर आहे. पण एकेकाळी ती बॉलिवूडमधलं मोठं नाव होती. रंभा 'जुडवा'मध्ये सलमान खानसोबत दिसली होती. या चित्रपटातून तिला विशेष ओळख मिळाली. जुडवा व्यतिरिक्त रंभाने 'घरवाली बहरवाली', 'कारण मी खोटं बोलत नाही' यासह अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. रंभाने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT