Rakhi Sawant Latest News Saam TV
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant News: राखीचा चाहत्यांना आत्मनिर्भर राहण्याचा सल्ला, घटस्फोटानंतर तिच्या डोक्यात प्रकाश पडला

राखीने नुकताच आपल्या चाहत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

Chetan Bodke

Bollywood News: बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतचा पती आदिल खान सध्या तुरुंगात पोलिस कस्टडीत आहे. यांच्यातील वाद हा आता खासगी राहिला नसून तो सर्वांनाच ठाउक झाला आहे. राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप करत त्याच्या विरोधात पोलिस स्थानकात धाव घेतली होती.

आदिल विरोधात मुंबई आणि म्हैसूर मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दरम्यान राखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत राखीने आदिलला बरेच टोमणे मारले आहे.

रोजच राखी माध्यमांसमोर येत आदिल बद्दल काही ना काही बोलत असते. कधी त्याच्या बद्दल रडते तर कधी त्याची काळजी करताना दिसते. तशीच ती आता विमानतळावर पापराझींच्या प्रश्नावर उत्तर देत होती. या व्हिडीओत राखी सावंत तिचं करिअर, पती आदिल खान आणि मोडलेलं लग्न याविषयी बोलताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओत राखी माध्यमांसमोर बोलते, 'काम करायला हवं, आपण आत्मनिर्भर बनायला हवं. ते म्हणतात ना, सीर सलामत पगडी पचास. पण आपण पडल्याशिवाय आपल्याला पुन्हा उठून काम करण्याची मज्जा फार वेगळी आहे. अनेक लोकांनी मला खाली पाडलं. माझ्या पतीनेही मला फसवलं. एवढ्या चांगल्या हॉट बायकोला सोडून तो दुसरीकडे गेला. पण आता मला कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे.'

गेले काही दिवसांपासून यांच्यातील वाद बरेच विकोपाला गेले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील केले होते. राखीने आदिलवर लैंगिक शोषण आणि मारहाणीचे आरोप केल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. या दरम्यान आदिल खानवर एका इराणी तरुणीने म्हैसूरमध्ये बलात्काराचा गुन्हाही दाखल केला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

SCROLL FOR NEXT