Rakhi Sawant Health News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Health News: 'मला आणि राखी सावंतला जीवे मारण्याच्या धमक्या...'; एक्स पतीने केला मोठा खुलासा

Rakhi Sawant Health News: बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. राखी सावंतची तब्येत बरी नसून तिला ट्यूमर असण्याची शक्यता आहे. राखी सावंतवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून ती बरी होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. राखी सावंतची तब्येत बरी नसून तिला ट्यूमर असण्याची शक्यता आहे. राखी सावंतवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून ती बरी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. राखी सावंतने स्वतः तिच्या तब्येतीबाबत अपडेट दिली होती. यानंतर आता राखी सावंतचा एक्स पती रितेशने आता मोठा खुलासा केला आहे. आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या, असं रितेशने सांगितले आहे.

रितेश सिंगने (Ritesh Singh)पापाराझीसोबत संवाद साधताना ही माहिती दिली आहे. राखीचे ऑपरेशन यशस्वी झाले आहे. तरीही तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिचा डायबिटीज आणि ब्लड प्रेशरमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहे. ती खूप तणाखाली आहे. तिला काही महिने बेड रेस्ट घेण्यास सांगितले आहे. पुढील १५ दिवस तिला निरिक्षणाखाली(Under Observation) ठेवण्यात येणार आहे.

राखी सावंतची ट्युमर टेस्ट करण्यात आली आहे. जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर डॉक्टर केमो थेरपी आणि पुढील उपचार सुरु करतील. राखीला कॅन्सर नसावा आणि ती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना आम्ही करत आहोत. सध्या राॉखीला निरिक्षणाखाली ठेवण्यास सांगितले आहे. तिच्या घरी तिची काळजी घेण्यासाठी कोणी नसल्याने तिला घरी नेण्यात काहीही अर्थ नाही, असेही त्याने सांगितले.

रितेश सिंग स्वतः तिची खूप काळजी घेताना दिसत आहे. त्यामुळे त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.या सगळ्यावर रितेशने सांगितले की, मी तिचा नवरा नाही. मी तिची मित्राप्रमाणे काळजी घेत आहे. मी तिचा शुभचिंतक आहे. लोकांनी मला ट्रोल केले तरीही मला फरक पडत नाही. मी तिच्या पाठीशी कायम उभा राहिन.

रितेशने पापाराझीशी बोलताना मोठा खुलासा केला आहे. राखीला आणि त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्याने सांगितले. कोणीतरी आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. नेमकं काय घडलं याबाबत आम्ही लवकरच माहिती देऊ. मला आणि राखीला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. या लोकांनी आमच्यापासून लांब राहावे. आमचा शत्रू कोण आहे, हे सर्वांनाच माहित आहे. त्या व्यक्तीविरोधात पुरावे मिळाल्यावर मी या गोष्टींचा खुलासा करेन. यावेळी आम्ही कायदेशीर मार्गाने या गोष्टींचा खुलासा करु, असंही त्याने सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

SCROLL FOR NEXT