Radhika Apte Pregnant SAAM TV
मनोरंजन बातम्या

Radhika Apte : राधिका आपटेकडे Good News! रेड कार्पेटवर फ्लॉन्ट केला बेबी बंप

Radhika Apte Pregnant : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने नुकताच आपल्या प्रेग्नन्सीचा खुलासा केला आहे. रेड कार्पेटवर बेबी बंप फ्लॉन्ट करताना राधिका दिसली आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकतीच राधिकाने तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. राधिका लवकरच आई होणार आहे. राधिकाने ही बातमी देऊन चाहत्यांना खूप खुश केलं आहे.

राधिकाने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी दिली आहे. राधिकाने बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. यात 'सिस्टर मिडनाइट' चित्रपटाचे स्क्रीनिंग पार पडले. यात राधिका बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. लग्नाच्या १२ वर्षांनी राधिका आई होणार आहे. अभिनेत्री राधिका आपटेने ब्रिटीश लोकप्रिय संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी 2012ला लग्नगाठ बांधली. हा ब्रिटीश व्हायोलिन वादक आहे. राधिका ३९व्या वर्षी आई होणार आहे.

राधिकाने या खास फिल्म फेस्टिव्हलसाठी बॉडीकॉन ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला होता. ती या ड्रेसमध्ये खूपच गोड दिसत होती. तिचा हा लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. राधिकाने अचानक प्रेग्नन्सीचा धक्का दिल्यामुळे चाहते खूप खुश झाले आहेत. तिच्या पोस्टवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

आपल्या अभिनयाने राधिकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तिने अनेक हिट चित्रपट केले आहेत. राधिका आपटे हिने मराठी आणि हिंदी दोन्ही सिनेसृष्टीत गाजवली आहे. तसेच तिने अनेक वेब सीरिज मध्येही काम केलं आहे. तिच्या वेब सीरिज मधल्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या आहेत. तसेच राधिका दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत 'कबाली' या सिनेमातही झळकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

India Waterfall : धबधब्याचं पाणी चक्क आकाशाकडे जातं! भारतातच पाहायला मिळतो निसर्गाचा 'हा' अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगमध्ये दोन गटात तुफान दगडफेक

विकासकामांच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा? नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

SCROLL FOR NEXT