Radhika Apte Bodyshaming Instagram
मनोरंजन बातम्या

Radhika Apte On Body Shaming: राधिका आपटेने शेअर केला बॉडीशेमिंगचा ‘तो’ किस्सा; नाकारलेल्या सिनेमाबद्दल केला धक्कादायक खुलासा...

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये इंडस्ट्रीत बॉडी शेमिंगची शिकार झाली होती. हा किस्सा नुकताच शेअर केला आहे.

Chetan Bodke

Radhika Apte Body On shaming: मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक अभिनेत्री सध्या बॉलिवूड सिनेसृष्टीत डेब्यू करीत आहेत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे, राधिका आपटे. राधिकाने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर सध्या बॉलिवूडमध्ये ही आपल्या अभिनयाची छाप पाडत आहे. राधिकाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर अनेकदा काही फोटोंमुळे देखील ती चर्चेत आली होती. आता त्यानंतर राधिकाने बॉलिवूडमधील एक भयानक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सोबतच तिला एक चित्रपट कोणत्या कारणामुळे गमवावा लागला, याचा तिने खुद्द खुलासा केला.

तिच्यासोबत करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ती इंडस्ट्रीत बॉडी शेमिंगची शिकार झाली होती. तिला नाक दुरुस्त करण्याचा आणि स्तनाचा आकार वाढवण्याचा सल्ला देण्यात आला. वाढलेल्या वजनामुळे तिला चित्रपटही गमवावा लागला होता. यावेळी ती म्हणली, “ मला बॉडीशेमिंग मुळे एक बॉलिवूड चित्रपट गमवावा लागला होता. माझे त्यावेळी तीन ते चार किलोने जास्त होते. अनेकदा मला माझ्या बॉडीवरूनही बोलले जात होते. मी नुकतीच इंडस्ट्रित नवीन होती. ‘तुझं नाक चांगलं नाही, तुझे स्तन मोठे नाहीत’ हे मला सुरूवातीला अनेकदा ऐकायला मिळालं होतं. ” (Latest Marathi News)

आता आपल्यामध्ये सर्वाधिक जागरूकता आल्याने आपण याविषयावर अगदी मोकळेपणाने बोलू शकतो. विचित्र कारण देत मला गेल्या काही दिवसांपूर्वी एका चित्रपटासाठी नाकरलं होतं. त्यांच कारण ऐकल्यावर मला खरंच फार विचित्र वाटलं. माझ्या तुलनेत दुसऱ्या अभिनेत्रीचे ओठ आणि शरीराची ठेवण अधिक चांगली होती. दुसरी अभिनेत्री तुझ्यापेक्षा अधिक आकर्षक दिसेल आणि ती खूप चालेल असं मला सांगण्यात आलं.” असं म्हणत तिने हा बॉडीशेमिंगचा किस्सा शेअर केला. (Latest Marathi News)

“प्रेक्षकांची विचार करण्याची क्षमता फार वेगळी आहे. बदलापूर चित्रपट येईपर्यंत लोकांना वाटायचे की मी फक्त खेड्यातील मुलीचीच भूमिका चांगली करू शकते. त्या चित्रपटानंतर लोकांची माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. बदलापूरनंतर लोकांना माझ्यात फार बदल जाणवायला लागले. अनेकांच्या मते मी फक्त सेक्स कॉमेडीच करू शकते असे मत होते. मी स्ट्रीप करू शकते. म्हणून, मी थांबले, मी त्यांना कधीच त्या भूमिकांसाठी हो म्हटलं नाही.” असं सुद्धा राधिका म्हणाली.(Latest Entertainment News)

राधिकाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर, येत्या १४ एप्रिलला राधिकाचा ‘मिसेस अंडरकव्हर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. Zee 5 वर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात राधिका गृहिणी आणि गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. या कॉमेडी-थ्रिलरचे दिग्दर्शन अनुश्री मेहताने असून यात सुमित व्यास आणि राजेश शर्मा यांच्याही भूमिका आहेत.(Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT