आपल्या अभिनयाने जगाला वेड लावणारी अभिनेत्री राधिका आपटे कायम तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि दमदार अभिनयामुळे चर्चेत असते. तिने आजवर मराठी, हिंदी साऊथ चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केले आहे. अलिकडेच राधिका आई झाली आहे. तिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ती अनेक वेळा मुलीसोबतच्या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केला आहे.
राधिका आपटे तिच्या मुलीला घेऊन पुन्हा भारतात परतली आहे. याचा खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. राधिका पहिल्यांदाच लेकीसोबत भारतात परतली आहे. इन्स्टाग्रामवर तिने बाळासोबतचा क्यूट फोटो शेअर केला आहे. या पोस्टला राधिकाने खूप हटके कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की, "मातृभूमीत पाऊल ठेवलं आहे. मुंबईशी ओळख करून देण्यासाठी आईने सर्वोत्तम महिना निवडला..." तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
राधिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने लेकीला छातीशी घट्ट धरून छान हसताना दिसत आहे. भारतात परतल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. परदेशात राहून आता राधिका भारतात आली आहे. राधिका वयाच्या 39 वर्षी आई झाली. लग्नाच्या 12 वर्षांनी हे दोघे आई-बाबा झाले आहेत.
राधिकाने 2012 मध्ये संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्नगाठ बांधली. बेनेडिक्ट टेलर (Benedict Taylor) हा ब्रिटीश व्हायोलिन वादक आहे. राधिका 2011मध्ये लंडनमध्ये बेनेडिक्टला भेटली. तिथे राधिका कंटेम्परी डान्स शिकण्यासाठी गेली होती. यावेळी तिची ओळख बेनेडिक्टशी झाली. बेनेडिक्ट टेलर हा लंडनमध्ये स्थायिक होता. यानंतर ती दोघ एकत्र बोलू लागली त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री झाली. मग या दोघांनी 2012 ला लग्नगाठ बांधली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.