Preity Zinta Saam Tv
मनोरंजन बातम्या

Preity Zinta: प्रीतीकडे एकही चित्रपट नसताना कोट्यवधी कमावते, नेटवर्थ वाचाल तर बसेल दातखिळी...

गेले अनेक वर्ष चित्रपटांपासून दूर राहूनही प्रीती झिंटाची कमाई कोट्यवधींमध्ये आहे.

Chetan Bodke

Preity Zinta: बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीती झिंटाने इंडस्ट्रीत आपल्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळे चाहत्यांना घायाळ केले आहे. प्रीती झिंटाने बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. 24 वर्षांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या प्रीती झिंटाने आपल्या करिअरमध्ये अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. गेले अनेक वर्ष चित्रपटांपासून दूर राहूनही प्रीती झिंटाची कमाई कोट्यवधींमध्ये आहे. जाणून घेऊया तिच्या नेटवर्थबद्दल.

प्रीती झिंटाने फिल्मी करिअरची सुरुवात मॉडेलिंग, जाहिरात आणि फिल्म्समधून केली होती. मणिरत्नम यांचा 'दिल से' हा तिचा पहिला चित्रपट होता. प्रीती सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण ती आयपीएलच्या काळात चर्चेत राहते. प्रीती आयपीएल टीम 'Punjab Kings' संघाची मालकीण आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रीती झिंटाची एकूण संपत्ती 15 मिलियन डॉलर म्हणजेच 110 कोटी रुपये आहे. प्रिती झिंटाची स्वतःची प्रोडक्शन कंपनी आहे. PZNZ Media असे या कंपनीचे नाव आहे. सोबतच प्रीती झिंटा आयपीएल टीम 'Punjab Kings'ची सहमालक आहे. सरकारला सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये तिचा आजही समावेश आहे.

प्रीतीची मुख्य कमाई ब्रँड एंडोर्समेंटमधून येते. ती एका जाहिरातीसाठी तब्बल 2 ते 2.5 कोटी रुपये इतके मानधन आकारते. याशिवाय प्रीती चित्रपट निर्मिती असून ती टीव्ही होस्टमधून देखील चांगली कमाई करते. प्रीतीचे वार्षिक उत्पन्न 12 कोटींहून अधिक आहे.

रिपोर्टनुसार, प्रीती झिंटाचे मुंबईत दोन आलिशान बंगले आहेत. प्रीतीचा जन्म शिमल्यात झाला असून तिथे तिचे एक अलिशान घर देखील आहे.कॅलिफोर्नियामध्ये देखील प्रीतीचे घर आहे, तिथे ती तिच्या पतीसोबत स्थित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT